संपादक---- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.--9730 867 448
सेकंडरी स्कुल्स एम्प्लॉइज को-ऑप क्रेडिट सोसायटी लि मुंबई च्या वतीने दरवर्षी पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी याना प्रदान केला जातो ,यावर्षीही या पुरस्काराचे वितरण राष्ट्रीय मिल मजदूर संघ मुंबई येथे दि 04 /11/2023 वार शनिवार रोजी झाला. यामध्ये उत्कृष्ठ कार्य केल्या बद्दल इंदिरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मंगरूळ ता तुळजापूर येथील मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुदर्शन शिंदे सर यांना यावर्षी चा हा पुरस्कार विधान परिषदेचे माझी सभापती आमदार- प्रविण दरेकर ,आमदार - प्रसाद लाड ,संस्थेचे चेअरमन - चंद्रकांत पाटील, संचालक - प्रमोद देशमुख व सर्व संचालक यांच्या उपस्थित प्रदान करण्यात आला.
त्याचे औचित्य साधून आज विद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयाच्या प्रांगणात प्रभाकर चव्हाण सर , बालाजी डोंगरे सर ,सुनंदा बचाटे मॅडम ,बंडू डोंबाळे सर, प्रा अनिल बनसोडे सर ,प्रा बालाजी गुरव सर ,प्रा कुसुम करपे मॅडम ,आशिष साठे सर , कल्पना मशाळकर मॅडम ,ज्ञानदेव लोहार ,शिवाजी पारधे ,विजया जाधव ,दाजीबा मिसाळ ,सुभाष बाशेवाड व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
**इंदिरा माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुदर्शन शिंदे सर यांना हा वरील पुरस्कार मिळाल्याबद्दल टाइम्स 45 न्यूज मराठी समूहाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन**
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा