Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १९ डिसेंबर, २०२३

पुन्हा परततोय मास्कचा काळ ? कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ने 5 जणांचा मृत्यू ! -----अशी आहे केंद्राची नवी ॲडव्हायजरी

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

  *मो.9730 867 448*

                       कोरोनाचा नवा व्हेरिअंट JN1 भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये धडकला आहे. हा व्हेरिअंट धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. या व्हेरिअंटमुळे देशात आतापर्यंत 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या व्हेरिअंटचा धोका लक्षात घेत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी हेल्थ अ‍ॅडव्हायजरीही जारी केली आहे. यात सर्व राज्यांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.


'गर्दी कंट्रोल करण्यासाठी पावले उचला' -



आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या अ‍ॅडव्हायजरीनुसार, 'तपासणीमध्ये कोरोनाच्या नवा व्हेरिअंट जेएन 1 च्या भारतातील प्रवेशाची पुष्टी झाली आहे. यामुळे सर्व राज्यांना पूर्णपणे अलर्टवर रहावे लागणार आहे. नव्या वर्षा निमित्त होणाऱ्या कार्यक्रमांत गर्दी कंट्रोल करण्यासाठी योग्य ती पावले उचलावे लागतील. कोरोना प्रकरणांची आरटी पीसीआरचा वापर करून टेस्टिंग वाढवावी लागेल. सर्व प्रकारच्या तापांचे नियमितपणे मॉनिटरिंग करावे लागले. तसेच, एखाद्या रुग्णाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास, त्याचे सॅम्पलही जिनोम सिक्वेंसिंगसाठी INSACOG LAB मध्ये पाठवण्यात यावे.' 

 *https://bit.ly/3cJPok

 कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने 5 जणांचा मृत्यू -


आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात सोमवारी कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून 1828 आहे. दरम्यान देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5 झाली आहे. मृतांमध्ये 4 जण केरळ, तर 1 उत्तर प्रदेशातील आहे. तसेच, देशातील मृत्यू दर 1.19 टक्के आहे. यापूर्वी रविवारी देशात कोरोनाचे 335 नवे रुग्ण डिटेक्ट झाले आहेत.


     *सौजन्य*

li.माहिती.सेवा.ग्रूप.il

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा