Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २ डिसेंबर, २०२३

बाळासाहेब सूर्यवंशी म्हणजे एक आदर्श पालक आणि आदर्श कामगार प्रतिनिधी --पांडुरंग भाऊ देशमुख.

 


*संपादक---- हुसेन मुलाणी*

*! टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.--9730 867 448*

           बाळासाहेब सूर्यवंशी म्हणजे एक आदर्श पालक आणि आदर्श कामगार प्रतिनिधी आहेत असे गौरोवदगार अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अकलूज ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व सन्मित्र विचार संघाचे संस्थापक पांडुरंग भाऊ देशमुख यांनी

अकलूज आगारातील यांत्रिक विभागातील कर्मचारी बाळासाहेब सुर्यवंशी यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने कामगार सेना अकलूज आगाराच्या वतीने आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.



या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आबासाहेब रणवरे यांनी केले


पुढे बोलताना पांडुरंग भाऊ देशमुख म्हणाले की,

"बाळासाहेब सुर्यवंशी यांनी राज्य परिवहन महामंडळाची ३४ वर्षे सेवा करताना आपल्या मुलांना उत्तम प्रकारे शिक्षण देऊन

डाँक्टर आणि इंजिनियर बनविले,कामगार जीवनात चळवळीत झोकून देऊन तळागाळातील कामगारांसाठी आपले जीवन वाहून घेतले त्यामुळेच आज जिल्ह्यातील शेकडो कामगारांची सन्मान सोहळ्यास उपस्थिती दिसून येत आहे तसेच अकलूज आगाराचा महाराष्ट्रात सातवा क्रमांक आल्याबद्दल अकलूजकरांच्या वतीने

आगारव्यवस्थापक त्यांचे सहकारी अधिकारी व सर्व कामगारांचे आम्ही अभिनंदन करतो"



याप्रसंगी प्रकाश अवस्थी यांनी प्रभावी मनोगत व्यक्त करत बाळासाहेबांच्या कामगार जीवनाचा वेध घेत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली

     यावेळी सन्मान सोहळ्यास अकलूज आगाराचे आगाराव्यवस्थापक प्रमोद शिंदे ,यंत्र अभियंता अनिरूध्द सुर्यवंशी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डाँ रामदास देशमुख ,कामगार सेना राज्य उपाध्यक्ष प्रकाश अवस्थीसाहेब,

युवा सेना जिल्हा अध्यक्ष स्वप्निलभैया वाघमारे,युवा नेते -

अँड विरेंद्र वाघमारे,शिवसेना तालुकाध्यक्ष - भैया राऊत,अकलूज शिवसेना शहराध्यक्ष उमेशजी जाधव आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

      याशिवाय कामगार चळवळीतील कामगार सेना पुणे प्रादेशिक सहसचिव - शशिकांत झुंजार

सोलापूर विभागीय सचिव - शिवाजी काशिद विभागीय अध्यक्ष - बाळासाहेब मोरे

कोषाध्यक्ष - महावीर नळे कार्याध्यक्ष -सोमेश बिज्जरगी

कार्यकारिणी सदस्य करण कोळेकर,इत्यादी उपस्थित होते.

     राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक - सुभाष गायकवाड ,सुरवडचे सामाजिक कार्यकर्ते - दादा कोरटकर, शाखा अभियंता मा

उत्तम भानुदास माने - देशमुख ,सहकार महर्षी कारखान्याचे कोजन प्रमुख - युवराज निंबाळकर माजी सैनिक प्रगतशील बागायदार - जनार्दन गमे पाटील

अकलूज आगारातील वाहतुक नियंत्रक -

राजाभाऊ गोसावी,वाहतुक नियंत्रक - कांतीलाल मदने

वाहतुक नियंत्रक -

संजय पिसे वाहतुक नियंत्रक - विजय रंधवे ,मुख्य लिपीक - उदय दुपडे सोसायटीचे व्हाईसचेअरमन - अशोक येडगे ,वाहन परिक्षक- विलास निंबाळकर तसेच सामाजिक ,राजकीय 

शैक्षणिक कामगार चळवळीतील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचलन साहित्यिक व व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड यांनी केले. तर बाळासाहेब सुर्यवंशी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा