*संपादक---- हुसेन मुलाणी*
*! टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
धाराशिव लोकसभा मतदार संघातील दिव्यांग बांधवांसाठी 3 डिसेंबर या दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दि.1 डिसेंबर रोजी धाराशिव चे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या हस्ते व तुळजापूरचे गट विकास अधिकारी ताकभागे आणि तहसीलदार बोळंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांगाना साधन साहित्य वाटप करण्यात आले. दि. 17/04/2023 ते 24/04/2023 या कालावधी मध्ये संपूर्ण मतदार संघात दिव्यांग बांधवाचे तपासणी शिबीराचे आयोजन केले होते. ADIP योजने अंतर्गत मोफत कृत्रीम अवयव व साहित्य साधने वाटपासाठी संपुर्ण लोकसभा मतदार संघातील धाराशिव जिल्हयातील तुळजापूर येथे पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये एकुण 361 पात्र दिव्यांगना विविध कृत्रिम अवयव व साहित्य वाटप करण्यात आले..!
पात्र लाभार्थ्यांना सायकल, व्हील चेअर, कुबडीजोडी, श्रवणयंत्र, सी. पी. चेअर, अंधकाटी, स्मार्ट फोन,स्टीक, आदी साहित्य गरजु व पात्र लाभर्थ्यांना वाटप करण्यात आले.
यावेळी जगन्नाथ गवळी,कमलाकर काका चव्हान,सुधीर कदम,शामलताई वडणे.सुरखेताई मुळे.प्रदीप मगर,शामभाऊ पवार,बापुसाहेब नाईकवाडी, बाळासाहेब शिंदे.प्रतिक रोचकरी,सुनिल जाधव,बाळकृष्ण पाटील.विकास भोसले.,चेतन बंडगर, कृष्णात आण्णा मोरे,बालाजी पांचाळ,अमोल गवळी डॉक्टर जितेंद्र कानडे अनिल धोत्रे मनोज डोंगरे दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा