बी.टी.शिवशरण-श्रीपूर
टाइम्स 45 न्युज मराठी.
आगामी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे तीन खासदार निवडून येऊ शकतात तर त्यांच्या विरोधातील पक्षाचे बारा उमेदवार ते पाडू शकतात एवढी निश्चित ताकद वंचित बहुजन आघाडी ने महाराष्ट्रात निर्माण केली आहे शोषित वंचित पिडीत दुर्लक्षित समाज घटकांना सामावून घेतल्याने वंचितचा जोर वाढला आहे राज्यात आरक्षणाचा मुद्दा कळीचा बनला आहे गरजवंत मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळाले पाहिजे ही भुमिका अँड प्रकाश आंबेडकर यांनी सुरवाती पासून घेतलीं आहे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील व आंबेडकर यांच्या भुमिका एक सारख्या आहेत मराठा समाजाचे आंदोलन राज्यात सुरु असताना गावा गावात मंत्री आमदार खासदार नेते लोकप्रतिनिधी यांना गावबंदी करण्यात आली होती तसे फलक लावण्यात आले होते मात्र एकमेव अँड प्रकाश आंबेडकर यांना प्रवेश होता त्यांचे गावात मराठा समाजाने स्वागत केले स्वागताचे फलक लावण्यात आले होते मराठा समाजाला त्यांच्या बाबतीत सहानुभूती व आदर वाढला आहे यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी जर सकल मराठा समाजाला आवाहन केले वंचित बहुजन आघाडी ला निवडणुकीत सहकार्य करावे तर वंचित चे पारडे जड होईल मराठा समाज यावेळी वंचित बहुजन आघाडी बाबत सकारात्मक विचार करून अँड प्रकाश आंबेडकर यांना साथ देणारं असे वातावरण ढवळून निघाले आहे
वंचित बहुजन आघाडीचे सभांना राज्यात मोठी गर्दी होत आहे लाखोंचे गर्दी होत आहे सर्व सामान्य माणसाला न्याय अधिकार संरक्षण व महागाई कमी करण्याची ताकद आंबेडकर यांचे नेतृत्वात आहे हा विश्वास निर्माण झाला आहे जरांगे पाटील यांनी सत्ताधारी नेत्यांना जुमानले नाही किंवा त्यांच्या पोकळ आश्वासनांना भिख घातली नाही त्यांचेवर त्यांचा विश्वास अगर भरोसा नसल्याने ते जराही विचलित झाले नाहीत पण अँड प्रकाश आंबेडकर यांच्या भुमिका विचार त्यांना मान्य असल्याने वेळोवेळी जरांगे पाटील यांनी आंबेडकर यांचे बद्दल आदर व्यक्त केला आहे येत्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत आंबेडकर व जरांगे पाटील यांची भूमिका निर्णायक राहिली तर राज्यात परिवर्तन. व बदल अटळ आहे वंचित बहुजन आघाडीची ताकद रथी महारथी उमेदवार भुईसपाट होतील अशी वाढली आहे सर्वगुणसंपन्न चारित्र्यसंपन्न व गोरगरीब जनतेला निश्चितच न्याय मिळवून देणारा एकमेव नेता म्हणून अँड प्रकाश आंबेडकर यांचे बद्दल खात्री झाली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा