काटगाव ---प्रतिनिधी
रज्जाक शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
काटगाव ता. तुळजापूर येथे बाळूमामाच्या पालखी नं. 14 या पालखीचे उत्साहात आणि भक्ती भावाने स्वागत करण्यात आले मागील
गेले 7 दिवसापासून, सर्व जाती धर्माची ग्रामस्थांनी मिळून, पालखीसोबत आलेला भक्तांचे भक्ती भावाने सेवाभाव करत, सेवा केली यामध्ये जाती धर्माचा भेदभाव ना करता, सर्वधर्मीय ग्रामस्थांनी मिळून, पालखीतील सर्व अनुयायाच्या अन्नप्रसादाची व्यवस्था केली, पालखीसोबत आलेला सर्वजणांना, प्रेम भावाने मनोभावे त्यांच्याशी संभाषण करून त्यांचा उत्साह द्विगुणित झाला या बाळूमामाच्या पालखी चा पाच दिवस मुक्काम होता ग्रामस्थ अति उत्साहात आणि मनोभावे करत असलेली सेवा पाहून बाळूमामाच्या पालखीच्या वतीने ग्रामस्थांचे आभार व्यक्त करण्यात आले तसेच काटगावाने पंचक्रोशीतील आणि परिसरातील, सर्व भक्तांनी येऊन, बाळु मामाच्या पालखीचे दर्शन घेऊन पावन झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा