संपादक---- हुसेन मुलाणी*
*! टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
सहकार महर्षी कै.शंकररावजी मोहिते पाटील यांचा विचारांचा वारसा जपणारे लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे प्रेरणेने अकलूज मध्ये या वर्षी पासून "अकलूज फेस्टीवल" हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.
अकलुज हे गाव सहकाराच्या बरोबरच,संस्कृती आणि परंपरेचे माहेरघर आहे. असंख्य कलाकार ह्या मातीत घडले आणि घडत आहेत. तोच सांस्कृतिक वारसा जपला जावा तसेच या फेस्टीवलच्या माध्यमातून नवीन कलाकारांना प्रोत्साहन, चालना मिळावी या उद्देश्याने '"अकलुज फेस्टीवल’" ची सुरुवात केली आहे.
२७ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत अकलूज येथील धवल श्रीराम मंदिर परिसरात सदर अकलूज फेस्टीवल चे आयोजन करण्यात आले आहे. यात फॅशनेबल कपडे, गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसह खाद्यपदार्थांचा आस्वादही घेता येणार आहे. लहान मुलांसाठी फनफेअरही आयोजित करण्यात आले असून, दररोज नृत्यासह विविधरंगी मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत.
सबब सदर कार्यक्रमास वीज व्यवस्था व इतर व्यवस्था सुरळीत ठेवणे संदर्भात संबंधीत विभागाला सुचना करण्यात आल्या आहेत.
डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते- पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा