Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ७ डिसेंबर, २०२३

हवामान घटक बदलामुळे प्रतिकूल परिस्थितीत पीक संरक्षण प्रतिबंधात्मक उपाय करणे काळाची गरज --मंडल कृषी अधिकारी-- सतीश कचरे,

 


विशेष प्रतिनिधी---राजु(कासिम)मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी.


हवामान बदल व पिक संरक्षण उपाय योजना . हवामान घटक बदलामुळे प्रतिकुल परिस्थितीत पीक संरक्षण प्रतिबंधात्मक उपाय करणे काळाची गरज आहे. प्रतिबधात्मक उपाययोजना ही कधीही उपचार योजना पेक्षा कमी खर्चीक व सरस असते . दिनांक १ डिसेबर ते १७ डिसेबर या कालावधीत हवामान अभ्यासक व शासकिय विभाग यांनी तुरळक ते मुसळधार अवकाळी पाऊस , आर्द्रता वाढ, सुर्यप्रकाश कमतरता , थंड वारे चा अंदाज वर्तविला आहे .या हवामान घटकातील बदल यामुळे पिकाची वाढ , त्यावर पडणारे रोग व किड यामुळे पीक उत्पादन घट, प्रतवारी परिणाम यामुळे नुकसान होऊन आर्थिक हानी पोहचण्याची शक्यता आहे. पडणारा पाऊस ' ढगाळ वातावरण वाढलेली आर्द्रता यामुळे खालील पीकावर होणारे परिणाम व उपाययोजना खालील प्रमाणे करावी . *द्राक्षपीक* - यापिकात वरील हवामान घटक बदल मुळे मणी चिरणे, सडणे , गळणे भुरी व डाऊणी मिल्ड्यू प्रार्द्रभाव वाढून किंवा फळधारणा होणाऱ्या फ्रुटबड या वर परीणाम होतो त्यावर उपाययोजना खालीलप्रमाणे करावी १- अवकाळी पाऊस पडणारे पाणी बागेतून चर काढून त्रीव उतारासह किंवा प्लॅस्टिक मल्चिग आच्छादनाने बाहेर काढून द्यावे २ - द्राक्ष बाग वर अॅन्टा हेलनेट व प्रोटेक्शन पेपर ने झाकुन घ्यावे . ३ द्राक्ष मणी चिरणे फुटणे टाळणेसाठी १०% २मिलि कायटोसॅन फवारणी केल्याने मणावरील थरामुळे चिर फुटणे थांबविली जाते . ४- कुजलेली चिरलेली मणी काढून टाकून पुढील प्रद्रूभाव कमी करणेसाठी ५० पी.पी.एम कलोरीन डायऑक्साइड फवारणी करावी . ५ भुरी साठी सल्फर ४० ईसी ३मिली किंवा प्रार्द्रभाव अधिक असल्यास कलोरीन डायऑक्साईड ५० पीपीएम २ मिली प्रति लिटर फवारणी करावी ६- डाऊणी साठी पोटॅशिअम सोल्ट ऑफ अॅकटीन्ह फॉस्फरस ४ ग्रॅम किवा मेटीराम २ते २.५ ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावी . *कांदा* - या हवामान बदलामुळे करपा रोगाचा प्रार्द्रभाव टाळणेसाठी रोपे o . १ % कार्बन्डीझम चे द्रावणात बुडवून लावणी करावी . २ - ४० ते ५० दिवसा नंतर रोग नियंत्रणासाठी मॅन्कोझेब ० . ३% ३ ग्रॅम किवा कार्बेन्डीझम ०.१ % १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाचे अंतराने फवारणी करावी . *गव्हूपीक* - या प्रतिकुल हवामान घटकामुळे गव्हू पीकावर काळा व नारंगी ताबेरा लक्ष्मणे दिसून येतात . याचे प्रतिबधात्मक उपायसाठी २ .५ ग्रॅम मॅन्कोझेब प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . *ज्वारी व मका* - या हवामान बदलामुळे मका व ज्वारी पीकावर लष्करी अळीचा प्रार्दुभाव वाढू शकतो यासाठी प्रतिबधात्मक उपाय म्हणून पक्षी थांबे, हेलिओथिस फेरोमन ल्यूर्स ट्रप वापर करावा . प्राथमिक आवस्थेतेत १००० पीपीएम निबोळी अर्क ५ मिली प्रति लिटर फवारणी करावी. प्रार्दुभाव वाढलेस इमामेकटीन बेझोऐट २ ग्रैम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी . मावा तुडतुडे फुलकिडे - ढगाळ वातावरण सूर्यप्रकाश कमतरता या मुळे सर्व पिकावर या किडीचा प्रार्दुभाव होतो तो टाळणेसाठी स्प्रेपपाने पाणी व साबन मिश्रीत पाणी फवारणी करणे किंवा इमिडाक्लोरे अंतरप्रवाही किटकनाशक २मिली प्रति लिटर फवारणी करावी . तरी हवामान बदलावर वरील प्रमाणे प्रतिबधात्मक व उपचारात्मक उपाय करून पीक संरक्षण करण्याचे अहवान मंडळ कृषि अधिकारी नातेपुते श्रीसतिश कचरे व कार्यालयाने केले आहे .






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा