*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी
मो:-8378081147
-----: नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथील शेवरे बंधाऱ्याच्या कामावरून लोखंडी बर्गे चोरणाऱ्या चोरट्यांना ताब्यात घेण्यात इंदापूर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी माहिती दिली की, ३० ऑक्टोबर रोजी नीरा नरसिंहपूर येथील भीमा नदीवरील शेवरे बंधाऱ्यावरील लोंखडी ८१ बर्गे चोरी करीत पीकअपमध्ये टाकून जीप व एक मोटार सायकलवर सात चोरटे टेंभुर्णीकडे घेऊन जात असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक अजित बिरादार, सहाय्यक फौजदार प्रकाश माने, भरत जाधव, पोलिस हवालदार किरण चंदनशिवे, जगन्नाथ कळसाईत, आरिफ सय्यद, विनोद लोखंडे, गणेश ढेरे, तुषार चव्हाण, नारायण तेजाड, योगेश करचे, समाधान अहिवळे यांची वेगवेगळी तपास पथके तयार करून चोरट्यांचा पाठलाग केला. त्यात दुचाकीवरून पसार होऊ लागलेले ३ चोरटे ताब्यात घेतले. तसेच, पाठीमागील पिकअप जीपमध्ये असणारे चोरटे पोलिसांची चाहुल लागताच जीप वेडीवाकडी चालवत पळून जात होते. अत्यंत शिताफीने पाठलाग करून पोलिस हवालदार चंदनशिवे व पोलिस शिपाई सय्यद यांनी ३ चोरटे ताब्यात घेतले व एक चोरटा अंधाराचा गैरफायदा घेवुन पळून गेला.
या कारवाईत चोरी करणारे समाधान राजकुमार मदने (वय २२, रा. लवंग, ता. माळशिरस, जि. सोलापूर), गणेश दत्तात्रेय खंडागळे (वय २२, रा. माळीनगर, ता. माळशिरस), मयूर राजाराम वायदंडे (वय १८, रा. लवंग ता. माळशिरस), मनोज संतोष मंडले (वय १९, रा. वनवासमाची, ता. कराड, जि. सातारा), प्रशांत राजेंद्र जाधव (वय १९, रा. तांबवे, ता. माळशिरस) व प्रणीत राजकुमार मदने (वय २४, रा. लवंग, ता. माळशिरस), असे सहा चोरटे व चोरी गेलेले ८१ लोखंडी बर्गे, एक पिकअप जीप, मोटार सायकल, असा एकूण ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
अन्य गुन्ह्यांचीही कबुली :-
संबंधित चोरट्यांना ताब्यात घेतल्यानंतर सखोल तपास केला असता सदर आरोपीने इंदापूर पोलिस ठाणे हद्दीत आणखी ३ गुन्हे केल्याची कबुली दिली. तसेच, पोलिस ठाणे अकलूज, टेंभुर्णी, पंढरपूर, मंगळवेढा, या पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
-





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा