Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १९ डिसेंबर, २०२३

उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या अध्यक्षपदी -"तौफिकभाई शेख" यांची निवड.

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

  *मो.9730 867 448*

            राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र राज्य च्या "उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष" पदी तौफीक वलीआहमद शेख यांची निवड करण्यात आली असून या निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यते नुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांनी दिले



    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद चंद्र पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य अल्पसंख्यांकाच्या विकासा साठी भरीव कार्य करणार असून पक्ष संघटना मजबुती ने उभी करण्यासाठी मी कटिबद्ध असून पक्षाची ध्येय धोरणे नुसार मी पक्ष बळकटीसाठी काम करुन त्याचे प्रामाणिकपणे पालान करेन असे याप्रसंगी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष तौफिक शेख यांनी सांगितले

   या निवडी बद्दल तौफीकभाई चे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या अध्यक्षपदी "तौफिक भाई शेख" यांची निवड झाल्याबद्दल टाइम्स 45 न्यूज मराठी चे संपादक -हुसेन मुलाणी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा