इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
: बोले तैसा चाले......त्याची वंदावी पाऊले... या उक्ती प्रमाणे आज इंदापूर तालुक्याचे कार्यसम्राट, विकासरत्न आमदार दत्तात्रय (मामा) भरणे यांनी राज्यातील आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांच्या विविध मागण्या व समस्यां संदर्भात विधिमंडळात औचित्याच्या मुद्द्याद्वारे प्रश्न उपस्थित करून त्यांना न्याय देण्यासाठी शासनाचे लक्ष वेधले.
दिलेला शब्द पाळणारा नेता अशी दत्तात्रय भरणे यांची राज्यभर ओळख आहे. इंदापूर, पुणे जिल्ह्या व राज्यातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी संघटनेने दत्तात्रय भरणे यांची यासंदर्भात भेट घेऊन आमच्या समस्या मांडण्याची विनंती केली होती. यावर श्री भरणे यांनी आपण विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित करून आपले म्हणणे शासनापर्यंत पोहोचवतो अशी ग्वाही दिली होती. यावर आज 19 डिसेंबर रोजी श्री भरणे यांनी अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा सेविका यांच्या संदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित करून त्यांच्या मागण्या मान्य करणे गरजेचे आहे. असे सांगत विविध मुद्द्यांचे सविस्तर विश्लेषण करून यावर शासनाचे लक्ष वेधून घेतले.
प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करणे हक्काच्या वेतनासह शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा तसेच वेतन व महागाई भत्तेही द्यावेत इतर शासकीय सोयी सुविधा द्याव्यात. या संदर्भात आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या प्रसंगी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला व शासनाचे लक्ष वेधून घेतले
यामुळे इंदापूर तालुक्यातील व राज्यातील आशा स्वयंसेविका त अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यामध्ये श्री भरणे यांनी आम्हाला न्याय देण्यासाठी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केल्याने त्यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
फोटो - आमदार दत्तात्रय भरणे.
---------------------------





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा