*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
राज्यातील अनेक रुग्णांना जीवदान देणाऱ्या 108 रुग्णसेवेच्या कंत्राटात तब्बल आठ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. एका मंत्र्याच्या पुढाकाराने साडेतीन हजार रुपयांचे कंत्राट आठ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आले. जुन्या कंत्राटदाराला बाजूला करून सर्व नियम बदलले आणि नव्या कंत्राटदारावर मेहेरनजर केल्याचे पुढे आले आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यातील रुग्णांना मोफत 108 क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा दिली जाते. सध्याच्या कंत्राटदाराला त्यासाठी दरमहा 33 कोटी रुपये दिले जात होते. या वर्षी जानेवारी महिन्यात या कंत्राटदाराची मुदत संपुष्टात येत आहे. त्याचा फायदा घेत नवीन निविदा काढण्यात आली. रुग्णवाहिकेचे पंत्राट मिळवण्यासाठी नव्या पंत्राटदाराने एका बडय़ा नेत्याला गळाला लावले. रुग्णवाहिकेच्या निविदेतून तब्बल 55 टक्के नफा मिळवून देण्याचा प्रस्ताव सादर केला. एवढी मोठी रक्कम पाहिल्यावर या नेत्याने रुग्णवाहिकेच्या जुन्या कंत्राटदाराला दूर करण्यासाठी नव्या निविदा काढल्या. नव्या कंत्राटदारासाठी सोयीच्या अटी-शर्ती तयार केल्या. निविदांबाबत कोणतीही वाच्यता न करण्याची ताकीद या नेत्याने दिली.
नातेवाईकाचा खिसा भरण्यासाठी टेंडरची रक्कम वाढवली
एका मंत्र्याच्या नातेवाईकाचा, जवळच्या कंत्राटदाराचा खिसा भरण्यासाठी सरकारने टेंडरची रक्कम वाढवली. यासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी करणार असल्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
निविदा 7 दिवसांत
निविदा काढण्यासाठी पेंद्रीय दक्षता आयोगाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार निविदांसाठी किमान 21 दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कंत्राटदारांना यामध्ये सहभागी होता येईल, पण आयोगाची मार्गदर्शक तत्त्वे पायदळी तुडवून सात दिवसांत निविदा जारी करण्यात आली. 4 जानेवारीला काढलेल्या निविदांची मुदत 16 जानेवारीला संपुष्टात येईल. आयोगाने नियम बाजूला ठेवण्यासाठी सॉफ्टवेअरमध्येही बदल करण्यात आल्याचे वृत्त आहे.
*साभार*
*कोकण न्यूज*




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा