Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १९ जानेवारी, २०२४

*आमदार "रोहित पवार "यांना ई डी ची नोटीस* *२४जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

   *मो.--9730 867 448*

           मुंबई:-राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीची नोटीस बजावण्यात आलीये. दरम्यान रोहित पवार यांना बुधवार २४ जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.



या आधी देखील केंद्रीय यंत्रणांकडून रोहित पवारांना वेगवेगळ्या प्रकरणात नोटीस बजावण्यात आली होती. तसेच नुकतचं त्यांच्या बारामती ॲग्रोशी संबंधित कारखान्यांवर ईडीचे छापे पडले होते. त्यानंतर आता रोहित पवार यांनी ईडीची नोटीस बजावण्यात आलीये.

         दरम्यान मागील अनेक दिवसांपासून रोहित पवारांच्या घरी ईडीची छापेमारी सुरु होती. पण त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले नव्हते. तसेच मी ज्याप्रकारे वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करतोय, त्यामुळे माझ्यावर केंद्रीय यंत्रणांचा दबाब आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं रोहित पवारांकडून वारंवार सांगण्यात येत होतं.

,,त्यामुळे आता या सगळ्या घडामोडींवर रोहित पवार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच यानंतर रोहित पवार चौकशीला हजर राहणार का? हे महत्वाचे आहे.

बारामती ॲग्रोवर ईडीची छापेमारी

बारामती ॲग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती.

आमदार रोहित पवार यांची ही बारमती ॲग्रो कंपनी आहे. बारामती ॲग्रोच्या सहा कार्यालयावर ईडीकडून तपास करण्यात आला. मागील वर्षी याच संदर्भात रोहित पवारांना नोटीस बजावण्यात आली होती. आता त्यांच्या कंपनीवर छापेमारी करण्यात आलीये.

रोहित पवारांना याआधी देखील नोटीस आली होती --शरद पवार

▪दरम्यान रोहित पवारांना ईडीची नोटीस बजावल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आलीये. रोहित पवार यांना आधी देखील नोटीस आली होती, असं म्हणत शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली.


           *सौजन्य*

        *कोकण न्यूज*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा