Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २० जानेवारी, २०२४

*भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा निर्णय;--- 31 जानेवारीपासून के. वाय.सी ,पूर्ण न केलेले "फास्टॕग" निष्क्रिय होणार* !..

 


*अकलुज -- विशेष प्रतिनिधी* *राजु (कासिम)-- मुलाणी*

*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो. 8408817333

                   31 जानेवारीपासून केवायसी पूर्ण न केलेले फास्टॅग निष्क्रिय होणार असल्याचा निर्णय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नुकताच जाहीर केला आहे.

एकाच वाहनासाठी अनेक फास्टॅग आणि केवायसीशिवाय होत असलेल्या फास्टॅगच्या वाढत्या वापरामुळे हा निर्णय घेण्यात आला.टोलनाक्यांवरील टोलवसुली अधिक कार्यक्षम व्हावी आणि विनाअडथळा वाहतूक व्हावी, यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 'वन व्हेइकल, वन फास्टॅग' हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याच अनुषंगाने हा निर्णय घेतला गेला आहे.



फास्टॅगमध्ये केवायसी अपडेट करण्याची प्रक्रिया:

केवायसी प्रक्रिया ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. ज्याद्वारे वापरकर्त्या ग्राहकांची ओळख निश्चीत केली जाते.

आर्थिक सेवांचा लाभ घेताना वापरकर्त्यांनी आपला केवायसी तपशील देणे आवश्यक असते. फास्टॅगसाठीदेखील हे लागू आहे.

केवायसी तपशीलांमध्ये बदल झाला असल्यास तो बँकेकडे अद्ययावत करणे गरजेचे आहे.

           *सौजन्य*

        *कोकण न्युज*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा