इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- येथील चैतन्य विद्यालय व सु गो दंडवते कनिष्ठ महाविद्यालयात तसेच गिरवी, टणू, पिंपरी बुद्रुक व नरसिंहपूर ग्रामपंचायत येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
नीरा नरसिंहपूर येथील चैतन्य विद्यालय व सु.गो.दंडवते कनिष्ठ महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती "युवक दिन" म्हणून व राजमाता जिजाऊ यांची जयंती विविध उपक्रमाने म्हणजे मराठी, इंग्रजी, हिंदी, विषयांच्या वक्तृत्व, निबंध स्पर्धा व राजमाता जिजाऊ याच्या वेशभुषेत "मी राजमाता जिजाऊ बोलतेय" विद्यार्थ्यींनी सहभाग घेऊन मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शि. प्र. मंडळाचे कार्यवाह श्रीकांत दंडवते होते. तसेच खजिनदार मगनदास क्षीरसागर उपस्थित होते. विद्यालयाचे प्राचार्य गोरख लोखंडे सर यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या बद्दल माहिती सांगून मार्गदर्शन केले.
श्रीकांत दंडवते यांनी स्वामी विवेकानंद व छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श व संस्कारक्षम राजा बनण्यासाठीचा उपदेश शिकवण कशी दिली यांची माहीती दिली. सांस्कृतिक विभागास धन्यवाद देत सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे कौतुक केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख लावंड सर यांनी सुत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले.
तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत सर्व विद्यार्थी- विद्यार्थीनींनी व सर्व शिक्षकांनी मुख्यमंत्री संदेश पत्राचे वाचन केले.
तर नरसिंहपूर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच प्रतिनिधी नितीन सरवदे, उपसरपंच गुरूदत्त गोसावी, विठ्ठल देशमुख, चंद्रकांत सरवदे, दशरथ राऊत, आनंद काकडे, सुनिल मोहिते, किशोर मोहिते, ग्रामसेवक महेश म्हेत्रे आदिंच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.
पिंपरी बुद्रुक येथे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच भाग्यश्री बोडके, उपसरपंच संतोष सुतार, पांडुरंग बोडके, ज्योती बोडके, अनुराधा गायकवाड, सुनिता शेंडगे, ग्रामसेवक गणेश लंबाते आदिंच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.
गिरवी येथे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच प्रतिनिधी पांडुरंग डिसले, उपसरपंच दादासाहेब क्षिरसागर, अनिल शिरसागर, बाबुराव शिरसागर, माऊली शिंदे, हनुमंत गवळी, आनंद ठोकळे, पोपट कोरे, रमेश कांबळे, ग्रामसेवक बि. डी. मिसाळ आदि तर टणू ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच प्रतिनिधी तेजस मोहिते, समीर मोहिते, सागर मोहिते, ग्रामसेवक गणेश लंबाते आदिंच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.
फोटो - नरसिंहपूर येथील चैतन्य विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.
---------------------------






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा