इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
: दिल्ली सरकारच्या दारू धोरण घोटाळ्यात तिहार तुरुंगात असलेले आम आदमी पक्षाचे खासदार संजयसिंह यांनी अनोखे आंदोलन सुरू केले आहे. देशातील लोकशाही वाचविण्यासाठी दर शुक्रवारी उपवास करत आहेत. त्यांच्या या आंदोलनास जनतेने पाठिंबा द्यावा, असे आवाहन आपचे पुणे जिल्हाध्यक्ष अमोल देवकाते यांनी केले आहे.
खासदार संजयसिंह यांनी कारागृहातील भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून उपवास सुरु केला आहे. भारत माता संकल्प व्रत असल्याने प्रत्येक समाजातील व्यक्तींनी हा संकल्प करावा, असे आवाहनही जिल्हाध्यक्ष अमोल देवकाते यांनी केले आहे. खासदार संजयसिंह कारागृहातून बाहेर येईपर्यंत आपच्या कार्यकर्त्यांनी व्रत करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
देशात बेरोजगारी वाढत आहे, देशातील सुरक्षितता धोक्यात आली आहे, चीन देशात अतिक्रमण करून देशाची भूमीवर आक्रमण केले आहे, देशात शेतकरी आत्महत्या करत आहे. पंतप्रधान मोदी देशासाठी नव्हे तर काही उद्योजकांसाठी काम करीत असल्याने भारत मातेचे रक्षण करण्याची जबाबदारी सर्वसामान्य माणसांवर आल्याने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही आपचे पुणे जिल्हाध्यक्ष अमोल देवकाते यांनी केले आहे.
---------------------------




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा