Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ११ जानेवारी, २०२४

सदाशिवनगर येथील "कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय व जूनियर कॉलेज" मध्ये विशेष संस्कार शिबीर संपन्न....

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448*

             शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित, सदाशिवनगरता. माळशिरस जि.सोलापूर येथील कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय व जुनिअर कॉलेज ज्युनिअर विभाग अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर दिनांक 09/1/2024 वार मंगळवार रोजी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशाला समिती चे सदस्य विठ्ठल अर्जुन उपस्थित होते .तर

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जूनियर कॉलेजचे प्राचार्य देठे पोपटराव बळीराम उपस्थित होते .प्राचार्यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्राचार्य म्हणाले कि की देशातील राष्ट्रीय सेवा योजनेचे योगदान व महत्त्व सर्व स्वयंसेवकांना पटवून दिले .तसेच त्यांनी स्वयंसेवकांना श्रमदान करण्यासाठी प्रेरणा दिली .

          कार्यक्रमाचा पहिला दिवस दिनांक 9/1/2024 वार मंगळवार दिवशी स्वयंसेवकांनी ग्रामपंचायत कार्यालय सदाशिवनगर येथील मुरूम सपाटीकरण व परिसर स्वच्छता अभियान राबवले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय निंबाळकर सर यांनी केले .सदर कार्यक्रमासाठी प्रशाला समितीचे सदस्य विलास फडतरे,विष्णू भोंगळे, बबन भुजबळ सर ,सोमनाथ भोसले,तुकाराम चव्हाण,शौकत मुलानी,अंकुश डुबल ,मंगेश कुलकर्णी, सौ .आशा जगताप उपस्थित होते .त्याप्रसंगी कार्यक्रम अधिकारी बागल बी.व्ही तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा