*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
मुंबई - 11 जानेवारी :* दिवंगत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपविण्याचा भाजपचा डाव आहे. गुजराती लॉबीने महाराष्ट्रातील मराठी जनतेची शिवसेना खत्म करण्याचे काम एका मराठी माणसाकडून केले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेबाबत दिलेला निकाल दिल्लीवरून टाईप करून आला आहे, अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी हल्ला चढवला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात निकाल दिला. यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांना भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला.
राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीचा आदेश पाळतात, ते काय शिवसेना चालविणार ? असा सवाल करून कोण एकनाथ शिंदे, कोण भरत गोगावले. त्यांनी काय शिवसेनेची घटना लिहिली आहे का ? आता जनता ठरवेल खरी शिवसेना कुणाची, आम्ही जनतेच्या न्यायालयात लढू, निवडणुका घ्या, म्हणजे खरी शिवसेना कुणाची हे कळेल. आम्ही या निकालाविरोधात न्यायालयात लढा देऊ, अशी शिवसेना संपवून देणार नाही. शिवसेनेसाठी आम्ही जीव देण्यास तयार आहे. इतिहास तुम्हाला क्षमा करणार नाही. देशातील लोकशाहीचा हा काळा दिवस आहे.
*साभार*
*कोकण न्यूज*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा