Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २४ जानेवारी, २०२४

वीस वर्ष मंत्रीपदावर असतानाही अनेक प्रश्न सोडवता आले नाहीत, उलट आम्ही केलेल्या कामांचे श्रेय घेऊन पेपर व फ्लेक्स बाजी करण्यातच दंग - आमदार दत्तात्रय भरणे

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

          - काही लोक वीस वर्ष मंत्रीपदावर असतानाही अनेक प्रश्न सोडवता आले नाहीत. आम्ही केलेल्या कामांचे श्रेय घेऊन पेपर व फ्लेक्स बाजी करण्यात दंग आहेत. निवेदने देऊन व नेत्यांसमवेत फोटो काढून कोणती कामे होत नसतात तर त्याला मेहनत करावी लागते. (असे हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता टिका केली.) तालुक्यात एवढे काम करून माझ्यावर आरोप प्रत्यारोप होत असतील त्याचे मला मोठे दुःख वाटते अशी उदिग्नता माजी राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.



      बाजारतळ बावडा येथे किसान सार्वजनिक वाचनालयाच्या शुभारंभ (दि.१८ जानेवारी) प्रसंगी आमदार दत्तात्रय भरणे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे होते. यावेळी माजी सभापती प्रशांत पाटील, दत्तात्रय घोगरे, सुरेश शिंदे सर, संग्रामसिंह पाटील, दादासाहेब क्षिरसागर, तुकाराम घोगरे, विजय गायकवाड, नागेश गायकवाड, रणजीत घाडगे, शितल कांबळे, पांडुरंग कांबळे, संतोष सुतार आदि मान्यवर उपस्थित होते.



     आमदार दत्तात्रय भरणे बोलताना पुढे म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक घेवून मालोजीराजे यांची गडी व बाबांच्या दर्गासाठी निधी मंजूर करून आणला. तालुक्याचा वीस पंचवीस वर्षाचा इतिहास काढून बघितला तर दलित, मुस्लिम समाजाला निधी मिळाला नाही. परंतु २०१४ नंतर सर्वात जास्त निधी देण्याचे काम करण्यात आले आहे. तसेच आठ ते दहा दिवसामध्ये मुस्लिम समाजासाठी जवळपास चार ते पाच कोटीचा निधी देण्यात येणार आहे. यापूर्वीच्या राज्यकर्त्यांनी हिंदू मुस्लिम समाजामध्ये भेद पाडून भांडणे लावली व आपल्या पोळ्या भाजून घेत त्यांचा विकास खुंटवला आहे. त्याचप्रमाणे दलित समाजाला सन २०१२ नंतर सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून निधी आणण्याचे कामही माझ्या सारख्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात केले आहे. 

    कोरोनासह अडचणीच्या व दुःखाच्या काळात जे कोणी आपल्या पाठीशी उभा राहतो त्याला कायम स्मरणात ठेवले जाते. कोरोना व अडचणीच्या काळात गोरगरीब सर्वसामान्यांच्या कामी आलो तालुक्याचा आमदार म्हणून मी माझे नशीब समजतो. थोरामोठ्यांना तर कोणीही मदत करते परंतु सर्वसामान्य गोरगरीब, दलित, अल्पसंख्यांक यांना मदत केल्यास त्यांच्या कायम स्मरणात राहते. काही काळाने तालुक्याचा इतिहास लिहला जात असताना याची नोंद घेतली जाईल. आरोग्याबाबत यापूर्वी इंदापूर तालुक्यातील नागरिकांचा पुणे, मुंबई येथे कोणता इलाज करण्यात येत नव्हता. परंतु २०१२ नंतर आम्ही पगारी मानसे ठेवून आरोग्याच्या सुविधा पुरवण्याचे काम करत असल्याचे आमदार भरणे यांनी सांगितले. 

   जल जीवन योजनेसाठी प्रस्ताव द्या बावडा गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा समावेश केला जाईल. ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची भरती सुरू असून लवकरच सुरू करण्यात येईल. मुस्लिम बांधवांच्या विकास कामासाठी जेवढा निधी देता येईल तेवढा देण्यात येईल. बावडा येथूनच पोलीस स्टेशनचे कामकाज करण्यात येईल याची मी ग्वाही देतो. बस स्थानकासाठी जागा उपलब्ध करून द्या तातडीने पंधरा लाख रुपये देण्यात येतील. सर्वांगीण विकास कामासाठी लागणारा निधी कमी पडून दिला जाणार नसल्याची ग्वाही शेवटी आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.

     याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे सदस्यपदी धनंजय देशमुख तसेच प्रगतशील शेतकरी राजकुमार भोसले, अमर भोसले, आशिष शेंडे, राजेंद्र घोगरे, सुभाष आगलावे, विजय नायकुडे यांनी शेतात चांगले पिक आणल्याबद्दल सन्मान करण्यात आला. तर बावडा व वकिलवस्ती ग्रामपंचायतच्या नुतन सदस्यांचा तसेच खरेदी विक्री संघाचे पालवे, विजय घोगरे यांचा सन्मान करण्यात आला.

   प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष पंडित

पाटील यांनी केले. यावेळी आप्पासाहेब जगदाळे, प्रशांत पाटील, धैर्यशील पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. सूत्रसंचालन अजित टिळेकर यांनी तर आभार महादेवराव घाडगे यांनी मानले.

फोटो - बावडा येथील बाजारतळावर उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार दत्तात्रय भरणे.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा