अकलूज ----प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी
माळशिरस तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रसिद्ध प्रमुख तथा संचालक अशोक पवार (वेळापूर) आणि उपाध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे तालुका सरचिटणीस तथा संचालक ज्ञानेश्वर मिसाळ (वाघोली) यांची निवड झाली आहे.
संस्थेच्या अकलूज कार्यालयात पार पडलेल्या निवडणुकीत चेअरमन पदासाठी स्वाभिमानी परिवाराचे अशोक पवार यांनी विरोधी गटाच्या प्रदीप अवताडे यांचा १०-३ मताने एकतर्फी पराभव केला.उपाध्यक्ष पदासाठी स्वाभिमानी परिवाराचे ज्ञानेश्वर मिसाळ यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.मार्च २०२३ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत स्वाभिमानी शिक्षक परिवाराच्या पॅनलने सत्ताधारी पॅनलचा पराभव करून सत्ता काबीज केली होती. संस्थेचे माजी चेअरमन आप्पा खरात यांच्या हस्ते नूतन चेअरमन अशोक पवार यांचा तर मावळते व्हाईस चेअरमन अण्णा मगर यांच्या हस्ते नूतन व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर मिसाळ यांचा सत्कार संपन्न झाला.
यावेळी स्वाभिमानी परिवाराचे मार्गदर्शक दिलीप ताटे, इतिहास तज्ञ प्रशांत सरुडकर, परिवाराच्या सुकानू समिती सदस्य हनुमंत खताळ,विठ्ठल सावंत रमेश सरक,शहाजी काशीद,दगडू पवार,मनोहर एकतपुरे यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे जिल्हा, तालुकास्तरीय प्रतिनिधी कार्यकर्ते,सहयोगी संचालक विजय शिंदे,राजेंद्र उकिरडे, रामभाऊ काटकर,पांडुरंग मोहिते, अमोल नष्टे,दमयंती मांडवे आदींची उपस्थिती होती.
सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणारी माळशिरस तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक उलाढाल सुमारे ३२ कोटी असून सर्वाधिक कमी ८.४०% दराने कर्ज पुरवठा करणारी कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी पतसंस्था आहे. ८५० सभासद असलेली ही पतसंस्था दीर्घकालीन मुदत ठेवीवर ९% परतावा देते.
या पदाधिकारी निवडीमध्ये तालुका उपनिबंधक कार्यालयाचे बंडगर आणि गणेश जाधव यांनी काम पाहिले.त्यांना संस्थेचे सचिव सतेज दिवटे आणि बलभीम नवले यांनी सहकार्य केले.नूतन पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ,आदर्श शिक्षक समिती,शिक्षक समिती, जुनी पेन्शन हक्क संघटन,एकल शिक्षक सेवा मंच,शिक्षक भारती संघटना,अल्पसंख्यांक शिक्षक संघटना,कास्ट्रॅब शिक्षक संघटना,दिव्यांग शिक्षक संघटना,पदवीधर संघटना, मागासवर्गीय शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा