Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ७ फेब्रुवारी, २०२४

अकलूज शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या अध्यक्षपदी-- "राजीव गायकवाड" यांची निवड*...

 


*अकलुज ---प्रतिनिधी*

*बाळासाहेब गायकवाड

         सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षव व माजी आमदार .दिपकआबा साळुंखे यांनी अकलूजचे राजीव गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येयधोरणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व देशाचे नेते अजितदादा पवार यांचे आचार विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविल्याने त्यांच्या कार्याची पोच पावती म्हणुन राजीव गायकवाड यांची अकलूज शहर अध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे पञ .दिपकआबां साळुंखे यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी जनतेचे आमदार उत्तमराव जानकर, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व अजितदादा पवार यांचे विश्वासू सहकारी व सोलापूर जिल्हा नियोजन कमिटी सदस्य सुरेशआबा पालवे, माजी जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे नेते अशोकदादा गायकवाड, माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राहुल ढेरे माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते अभिषेक गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा