Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १ फेब्रुवारी, २०२४

*कळंब येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात "निर्भय कन्या अभियान "कार्यशाळा संपन्न*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448*

               सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ व विश्वासराव रणसिंग महाविद्यालय विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वार बुधवार दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी निर्भय कन्या अभियान ही एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी 10:30 वाजता दिपप्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. राजेंद्रकुमार डांगे यांनी केले. प्रास्ताविकात असे म्हटले की सर्व वयोगट ,प्रवाह , स्तरातील महिलांना केंद्रभूत मानून आयोजित कार्यशाळा केली आहे. महिला सबलीकरण महिलांचा, व्यक्तिमत्व विकास, स्त्रियांची प्रेरणास्थान, स्त्रियांची मानसिक स्वास्थ्य, महिलांचा सामाजिक व कौटुंबिक संवाद ,स्त्री हक्क अधिकार, स्त्रियांसाठीचे कायदे, स्त्रियांविषयी अयोग्य वर्तन, अन्याय मानसिक शारीरिक सामाजिक स्वरूपाचा आघात तसेच स्त्रियांच्या आत्मसन्मानाला बाधा पोहोचेल अशा स्वरूपाच्या वर्तन व अनुभवापासून संरक्षण प्रतिकार व प्रतिबंध इत्यादीवर आधारित व्याख्यानांचे व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात प्रा. किशोरी ताकवले यांनी सद्यपरिस्थिती आणि मुलींचे मानसिक व शारीरिक आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले.यामध्ये मानसिक आरोग्य सहृदय आहे की नाही हे तपासून पहा एकमेकांशी मनमोकळेपणाने बोला नाते सुदृढ करा. संवाद सकारात्मक करा विचारांशी मिळते जुळते असणारे अशी मैत्री करा योग्य निर्णय घ्या शारीरिक आरोग्य चांगले ठेवा मानसिक समस्या असेल तर मानसशास्त्रज्ञ समुपदेशक यांची मतं घ्या तसेच प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून अनेक प्रश्नांवर चर्चा केली.



 "जीवनगाणे गातच राहावे" या गाण्याने आपल्या मार्गदर्शनाचा शेवट केला. पहिल्या सत्रातील दुसरे वक्ते व मार्गदर्शक एडवोकेट रेश्मा गार्डे यांनी महिला विषयक संरक्षण कायदे याविषयी मार्गदर्शन केले. यामध्ये अत्याचार ,छळ वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणारा त्रास, हिंसा याविषयीच्या कायद्यांची चर्चा केली, काही महिलांचे प्रश्न यावर संवाद साधला याशिवाय कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात कुमारी स्नेहल कांबळे यांनी आमच्या विद्यार्थिनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण (कराटे) याबाबत प्रात्यक्षिकासह कराटे प्रकार करून घेतले. मुलींना आपले संरक्षण करण्याकरता कोण- कोणती कौशल्य आत्मसात केली पाहिजेत असे सांगितले. या कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंकुश आहेर हे होते. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये महाविद्यालयातील महिलांची संख्या, महिलांची कर्तव्यनिष्ठा, महिलांनी केलेली प्रगती तसेच त्यांनी असे म्हटले की " जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उधार करी" असे म्हटले आहे. या कार्यशाळेसाठी आमच्या संस्थेचे सचिव साहेब सन्माननीय वीरसिंह रणसिंग तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंकुश आहेर, उपप्रचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा यशस्वी झाली. या कार्यशाळेसाठी विद्यार्थिनी, महिला, महिला शिक्षक, महिला पालक असे 135 जणांनी उपस्थिती दर्शवली या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी, आय क्यू सी प्रमुख डॉ.प्रशांत शिंदे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. विलास बुवा हे उपस्थित होते. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. वैशाली झगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सोनाली चव्हाण यांनी मानले. पाहुण्यांचा परिचय प्रा .विद्या गुळीग यांनी करून दिला. फलक लेखन प्रा.कपिल कांबळे यांनी केले समिती सदस्य प्रा. योगेश खरात प्रा.सुरेश वाघमोडे व गणेश ठोंबरे सर यांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा