*श्रीपूर--बी.टी.शिवशरण.*
गेल्या पंधरा वर्षापुर्वी जेव्हा अमितेशकुमार हे सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक होते तेव्हा त्यांनी आपल्या प्रशासकीय कडक शिस्तीचा अनुभव जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना दिला होता ते सोलापूर जिल्ह्यात जो पर्यंत कार्यरत होते तो पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील एकाही तालुक्यातील कोणत्याही गावात अवैध वाहतूक अवैध धंदे वाळू तस्करी दंडेलशाही नव्हती त्यांनी सक्त आदेशच काढला होता सोलापूर जिल्ह्यात ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत गुन्हेगारी अवैध धंदे वाळू उपसा सापडेल त्या हद्दीतील पोलिस अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन निलंबित केले जाईल त्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की एकाही गावात अवैध प्रवासी वाहतूक जुगार मटका दारू विक्री होत नव्हती त्यांची करडी शिस्त व प्रशासकीय वचक एवढा होता की पोलिस खात्यातील काही मोकाट कामचुकार कर्मचारी अधिकारी यांची काही धडगत नव्हती सर्वसामान्य नागरिकांना पोलिस हे आपले मित्र रक्षक वाटले पाहिजेत आधार वाटला पाहिजे यासाठी पोलिस व जनता यांच्यात सुसंवाद वाढला पाहिजे यासाठी ते प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये संवाद सन्मान वाढवण्यासाठी दक्ष असत वर्षातून वार्षिक तपासणी असतेच पण कोणताही गुन्हा तक्रार विलंब न करता त्याचा निपटारा वेळच्या वेळी अधिकाऱ्यांनी केला पाहिजे या साठी ते प्रयत्नशील असत मी साप्ताहिक गस्त चा कार्यकारी संपादक असताना त्यांना सोलापूर येथे त्यांच्या कार्यालयात भेट घेतली होती त्यांच्या कामकाजाचे कौतुक केले त्यावेळी ते म्हणाले माझे कसलं कौतुक करताय माझे कर्तव्यच आहे मी माझे अखत्यारीतील प्रशासकीय काम करत असतो या पेक्षा मी वेगळे काय करत नाही त्यावेळी त्यांना साप्ताहिक गस्तचा वार्षिक दिवाळी अंक दिला त्यांनी विचारले अकलूज सारख्या ग्रामीण भागात एवढा दर्जेदार अंक काढताय तुमचे मी अभिनंदन करतो कैवल्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज यांच्यावर पुर्ण दिवाळी अंक प्रकाशित करण्यात आला होता त्यावेळी मी त्यांना सांगितले साप्ताहिक गस्त चे मुख्य संपादक हे चांद शेख आहेत त्यांच्या संकल्पनेतून व सौंदर्य दृष्टीकोनातून वैचारिक परिवर्तनवादी अध्यात्मिक पुरोगामी विचारांचा वारसा जपत साप्ताहिक गस्तची परंपरा ते जपतात अशी त्यांच्याशी चर्चा करताना माहिती दिली तेव्हा त्यांनी संपादक चांद शेख यांचे बद्दल आदर व्यक्त केला होता ते सोलापूर येथून औरंगाबाद ला गेले नंतर नाशिक येथे व नागपूर येथे कार्यरत होते त्यांनी कालच पुणे पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे अमितेशकुमार यांचें सारखे कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय सर्वसामान्यांचे आधारवड व कायद्याचे शिस्तपालन कठोरपणे करणारे अधिकारी म्हणून जर महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात लाभले तर कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मदतच होईल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा