*उपसंपादक----नुरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
शंकरनगर येथे सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने भव्य राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धा-२०२४ चे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धा दि. ९,१०, व ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील स्मृतिभवन, शंकरनगरच्या बादशाही रंगमंचावर संपन्न संपन्न होणार आहेत.
श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते-पाटील (आक्कासाहेब)यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त व जयसिह मोहिते- पाटील व मदनसिंह मोहिते- पाटील यांचे अमृतमहोत्सवी वाटचाली निमित्त पारंपारिक व नवकवींच्या लावण्यांचा नजराणाचे आयोजित करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील लोककलेचे वैभव असलेला लावणी हा प्रकार रांगडा,रोकड़ा,ठसकेबाज व श्रृंगाराने नटलेला एक सळसळता व लखलखता कलेचा अविष्कार आहे.महाराष्ट्रातील लावणी व लोक वाड़मयाचा इतिहास पाहता लावणीला सुमारे ४०० वर्षाची परंपरा आहे.परंतु या विज्ञान युगातील एकेकाळी महाराष्ट्राचे भूषण मानल्या गेलेल्या परंपरागत व अभिजात कलेवर विविध माध्यमांच्या आक्रणामुळे त्यामुळे महाराष्ट्राची लोककला पुसून टाकली जाईल की काय अशी भिती निर्माण झाली होती. नामषेश होऊ पाहणारा तमाशा व लावणी कला सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील यांच्या आश्रयाने उर्जितावस्थेत आली व त्यांनी महाराष्ट्र तमाशा परिषद स्थापन करून दरवर्षी हा तमाशा महोत्सव,लोकोत्सव केला. सहकार महर्षी यांनी लावणी कलाकारांना सन्मान मिळवून दिला.या कलेकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टोकान बदलून पूर्वी राजआश्रय लाभलेल्या या कलेला लोकाश्रय मिळवून दिला.त्यांच्या नंतर सहकार महर्षिचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी व लावणी कलेला उत्तेजन मिळावे,जुन्या पारंपारीक लावणीचे जतन होऊन त्यामध्ये वृध्दी व्हावी,नवकवीना उत्तेजन मिळावे,लावणी कलावंताना सामाजिक प्रतिष्ठा मिळावी, अस्सल लावणीच स्वरूप सर्वसामान्यांना समजावे आणि ही कला वृध्दींगत व्हावी म्हणून जयंती समारंभ समितीचे संस्थापक जयसिह शंकरराव मोहिते-पाटील यांनी सहकार महर्षीचे अमृत महोत्सवी जयंती वर्षांपासून जानेवारी १९९३ पासून दरवर्षी महाराष्ट्र राज्यपातळीवर लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन केले.ह्या स्पर्धेचा प्रवास सन २०१८ पर्यंत अविरतपणे तब्बल २७ वर्ष सुरू राहिला,या स्पर्धेचे यश म्हणजे आज लावणी अनेक कलावंताना चित्रपट,रियालिटी शो,विविध वाहिन्या याबरोबरच परदेशातही लावणीचे कार्यक्रम सादर करण्यासाठी निमंत्रित केले गेले. त्यांना सुगीचे दिवस आले व महाराष्ट्रभर चांगला नावलौकीक ही मिळाला.
जानेवारी १९९७ पासून कला क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केलेल्या एका कलावंताला दरवर्षी सहकार महर्षि शंकरराव मोहिते- पाटील पुरस्कार (स्मृतिचिन्ह व रोख रक्कम)देवून सन्मानीत केले आहे.महाराष्ट्राच्या लोक संस्कृतीची महाराणी म्हणजे लावणी.अकलूज आणि लावणी हे आता अतूट समीकरण बनल आहे,माळशिरस तालुक्यामध्ये देहु आळंदीच्या पालख्यांचे जितक्या उत्स्फूतपणे स्वागत होते.तितक्याच उत्साहाने स्वागत या घरंदाज लावणीचं होते.लावणी ही महाराष्ट्राची शान आणि मराठी मनाची जान आहे.काल प्रवाहात अवितरपणों तब्बल २७ वर्षे चाललेल्या लावणी स्पर्धेचा प्रवाह थोडासा चांगला होता.तोच प्रवाह अखंडीतपणे प्रवाहीत करण्यासाठी कलाकरांच्या व कलारसिकांच्या आग्रहास्तव संग्रामसिंह मोहिते-पाटील (कार्याध्यक्ष, सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती,शंकरनगर- अकलूज),कु.स्वरूपाराणी मोहिते-पाटील (अध्यक्षा,लावणी स्पर्धा कमिटी,सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती,शंकरनगर- अकलूज) यांच्या नेतृत्वाखाली व लावणी उत्तुंग शिखरावर पोहचवून सहकार महर्षीचे स्वप्न साकार करणारे जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा संपन्न होणार आहेत
या स्पर्धेसाठी बक्षीसे भव्य बक्षीसे खालील प्रमाणे
प्रथम क्रमांकास रु.५ लाख, सन्मान चषक,व्दितीय क्रमांकास ३ लाख रूपयाचे बक्षीस सन्मान चषक,तृतीय क्रमांकास रू.१ लाख व सन्मान चषक,चौथ्या क्रमांकास रू.७५ हजार व पाचव्या क्रमांकास रू.५१ हजाराचे बक्षीसे देण्यात येणार आहेत.त्याच प्रमाणे वैयक्तिक पारितोषिके उत्कृष्ठ नृत्यांगणा रू.५ हजार व (कै.श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील स्मृतीचषक),उत्कृष्ठ अदा (वैयक्तिक) रू.५ हजार, उत्कृष्ठ मजुरा रू.३ हजार,उत्कृष्ठ ढोलकी पडू,उत्कृष्ठ पेटी वादक,उत्कृष्ठ पाठ्यं गायीका व उत्कृष्ठ तबला वादक यांना प्रत्येकी रू.१ हजार अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.अशी माहिती कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील (अध्यक्षा,लावणी स्पर्धा कमिटी) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा