*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
नवी दिल्ली :* झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही केंद्रीय एजन्सीच्या चौकशीला सामोरे जात आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचीही ईडीकडून चौकशी सुरू आहे. अनेकजणांना ईडीने नोटीस पाठवली आहे. तर, काहीची चौकशी सुरु आहे. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत अशा नेत्यांची यादीच ईडीकडे तयार आहे.
👉 केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद, त्यांची पत्नी राबडी देवी आणि मुलगा तेजस्वी यादव यांची चौकशी सुरु आहे. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला, मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती अरुणाचलचे माजी मुख्यमंत्री नबाम तुकी, मणिपूरचे माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग, गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांचीही ईडीकडून चौकशी सुरू आहे. याशिवाय देशातील विरोधी पक्षांचे अनेक विद्यमान आणि माजी मुख्यमंत्रीही ईडीच्या रडारवर आहेत.
*सौजन्य*
*कोकण न्यूज*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा