*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
बारामती तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या अध्यक्षा कल्पनाताई काटकर (जाधव )यांच्या प्रयत्नामुळे आणि मदतीमुळे कर्जत जिल्हा अहमदनगर येथील सोनाली काळे यांना न्याय मिळाला आणि त्यांनी कल्पनाताई काटकर यांचे आभार मानले ते वाचा सोनाली काळे यांच्या शब्दात
*कल्पनाताई तुमचे मनस्वीआभार.*
माझ्या नशीबाचे पडले होते उलटे फाशे
कल्पनाताई तुमचे आभार शब्दात मानू कशी शब्द अपुरे पडत आहेत, मला वाटले होते.
आता सगळेच संपले आणि काहीही पर्याय नाही परंतु काळ्याकुट्ट अंधारात ज्याप्रमाणे काजवा चमकावा त्याप्रमाणे तुम्ही माझ्या मदतीला धावून आलात ....
माझ्याच नवऱ्याने पेपर नोटीस करून स्वतःची सर्व जमीन दोस्तांचा नावावर केली नवऱ्याने स्वतांचा मुलांचा विचार केला नाही.
परंतु देव आहे. हे म्हणतात ते खरेच आहे आणि साक्षात देव तुमच्या रूपात मला भेटला माझी गेलेली जमीन तुम्ही मला मिळवून दिली
स्वर्गीय बाळासाहेबांचा शिवसैनिक गोरगरीब जनतेचा मदतीला जरूर उभा असतो हे तुम्ही दाखवून दिले आणि बाळासाहेबांच्या शिकवणीचा फायदा
कल्पनाताई तुम्ही माझी मदत करून जगाला दाखवून दिले की बाळासाहेबांचा शिवसैनिक कसा असतो तशीच अनेक लोकांना तुम्ही नक्कीच मदत करणार हा माझा अत्मविश्वास आहे
कल्पनाताई काटकर सारख्यांच्या रूपात देव माझ्या नशीबात आला माझ्या मुलांना न्याय मिळाला त्यामुळे मी कल्पनाताई चे हे ऋण कधीही विसरणार नाही
आणि जे रंजले गांजले पीडित आहेत त्यांना मदत करण्याची ईश्वर कल्पनाताईंना ताकद देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..
आपली विश्वासू
सोनाली काळे
रा.कर्जत जि. अहमदनगर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा