Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १७ फेब्रुवारी, २०२४

निमसाखर येथे जि.प. शाळेत "आनंदी बाजार "उपक्रम संपन्न.

 


इंदापूर तालुका- प्रतिनिधी.

एस.बी.तांबोळी

टाइम्स 45 न्युज मराठी.

                आज शनिवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२४ रोजी निमसाखर येथीलजिल्हा परिषद प्राथमिक शाळा मध्ये "आनंदी बाजार" या उपक्रम संपन्न झाले     



          . या कार्यक्रमाचे उद्घघाटन निमसाखर गावच्या उपसरपंच .विद्याताई रणवरे, व.जयश्रीताई अडसूळ ,यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पं .स.सदस्य गोंविदराव रणवरे, केंद्रप्रमुख हगारे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष .दत्तात्रय घोडे सर व त्यांचे सर्व सहकारी, ग्रामसेवक .भिलारे . विशाल रणवरे व परिसरातील सर्व पालक बंधू भगिनी, व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



               विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच, जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे व्यवसायिक ज्ञान त्यांना मिळावे या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी भाजीपाला, फळे,स्टेशनरी, खाऊ,व सर्व प्रकारचे स्टाॅल लावले होते. गावातील लोक मोठ्या प्रमाणात बाजारासाठी उपस्थित होते. सर्वांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करून विद्यार्थ्यांबरोबर बाजाराचा आनंद लुटला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा