Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १७ फेब्रुवारी, २०२४

*महाराष्ट्रातील पाच खासदारांना यंदाचा" संसद रत्न पुरस्कार" जाहीर*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

               संसदेत चांगली कामगिरी करणाऱ्या आणि लोकांच्या हितासाठी आवाज उठवणाऱ्या खासदारांचा संसदरत्न पुरस्काराने सन्मान केला जातो. यंदाच्या या पुरस्कारांच्या मानकरींची यादी जाहीर झाली आहे.



यात महाराष्ट्रातील पाच खासदारांचा समावेश आहे. यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दोन खासदार, शिवसेना शिंदे गटातील दोन खासदारांचा समावेश आहे. तर भाजपच्या एका महिला खासदाराचा या पुस्कारार्थींच्या यादीत समावेश आहे. आज या पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे. राजधानी दिल्लीत हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.

संसदरत्न पुरस्काराचं आज वितरण

यंदाचे संसदरत्न पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्राईम पॉइंट फाउंडेशन मार्फत आज होणार संसद रत्न पुरस्कारांचं वितरण होणार आहे. सुप्रिया सुळे आणि श्रीरंग बारणे यांना संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. संसद महारत्न पुरस्कार हिना गावित आणि अधीर रंजन चौधरी यांना जाहीर झालाय. तर संसदरत्न पुरस्कार डॉ. श्रीकांत शिंदे, डॉ. अमोल कोल्हे यांना जाहीर झालाय.

              *सौजन्य*

           *कोकण न्यूज*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा