Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०२४

*लॉज परिसरात "अल्पवयीन मुलींचा वाढता वावर चिंताजनक" आणि पालकांसाठी आत्मचिंतन करणारा...*


 

*इक्बाल मुल्ला--(पञकार)*

 *सांगली..*

 *मो;-8983 587 160

              आपली मुलगी "खेळ" खेळण्यासाठी ग्राउंडवर जाते की "अन्य" खेळ खेळायला लॉजला जाते ??? लॉज परिसरात "अल्पवयीन" मुलींचा वाढता वावर चिंताजनक आणि माझ्यासह आणि समस्त पालकवर्गासाठी "आत्मचिंतन" करणारा ठरत आहे .

          संध्याकाळी सहा वाजल्याचा आसपास "शालेय शिक्षण" घेणाऱ्या आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित अल्पवयीन मुलींचा "वावर" लॉज परिसरात होत असेल तर एक पालक या नात्याने सर्वच मुलींच्या पालकांसाठी ही "धोक्याची घंटा" नाही का ??? "अल्पवयीन" मुलींचीं एक चुकीची पाऊलवाट भविष्यातील सुखसमृध्दीसाठी "स्पीडब्रेकर" ठरत असते हें लक्षात घ्यायला हवे. 

पालकांनी आपल्या मुलीला नेहमी मुलींच्या "मैत्रिणींच्या" घोळक्यात ग्रुप मध्येच ठेवावे. कारण एकटी मुलगी असेल तर, ती बिनधास्त असते व कोणासोबत काहीही करू शकते .कारण तिला पाहणाऱ्या मैत्रिणी तिच्यासोबत नसतात . ग्रुप मध्ये असेल तर एखादी मैत्रीण घरात आपलं भांडं फोडेल ही भीती असते . त्यामुळे ग्रुप मधील मुलगी सुरक्षित राहते .पालकांनी या बाबत "विचारमंथन" करावे,ही विनंती .



    "मैदानी खेळ"


 खेळणाऱ्या ,किंवा 16-17 वयाच्या असणाऱ्या आणि टी .शर्ट आणि स्पोर्ट "नाईट पॅन्ट "घालून बिनदिक्कत येणाऱ्या या मुलींना कोण रोखणार ???

 "पोलिसांना "या घृणास्पद विषयाची माहिती नाही का ??? प्रत्येक महिन्याला किती मलिदा कोणाला मिळतो ??? आपणास देखील "लहान" मुली आहेत की नाहीत ???

लॉज मध्ये आलेल्या मुलींसोबत थोराड दिसणारे 28-30 वयाचे ते तरुण कोण असावेत ?? "प्रशिक्षक "की आणखी कोण ??? कारण त्या तरुणांच्या खांद्यावर देखील अशीच "स्पोर्ट्स बॅग " असते .अल्लड वयात या मुलींना काही समजतं नसते. विविध स्पर्धेत नंबर मिळवून देतो ,भविष्यात सहज सरकारी नोकरी मिळते या भुलथापांवर ती मुलगी त्या तरुणाला बळी पडत नसावी ना ??? 

कारण या मुली त्यांच्या "मनाने" आलेल्या नसतात तर विविध आमिषाने त्या तरुणाच्या "कचाट्यात" सापडलेल्या असतात . मुली घाबरलेल्या अवस्थेत असतात , तर सोबत आलेला तो तरुण तोंड झाकेल अशाप्रकारचे जे टी.शर्ट बाजारात उपलब्ध आहेत ते घालून आलेला असतो. प्रयत्न करून देखील त्याचे "तोंड" दिसत नसते.  

           लॉजमध्ये मोबाईल मध्ये अर्धनग्न व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकण्याची धमकी ते तरुण या मुलींना देत असतील का ??? उमलू पाहणाऱ्या "कळीला " कुस्करून टाकणाऱ्या या प्रवृत्तीला "वेसण" घालायला नको का ??? 

"लॉज मालकांवर " कुणाचे बंधन आहे की नाही ?? सज्ञान तरुणी लॉज मध्ये येतात .तथापि अल्पवयीन मुली लॉज मध्ये आल्यास लॉज "कर्मचाऱ्यांनी" त्यांना "मज्जाव" करायला हवे .त्यांना उत्तेजन द्यायला नको . 

माझ्या "पोटाला" पण मुली आहेत. चुकून त्यांचा पाय घसरला तर ??? आज मी "समाजप्रबोधन" करतोयं. कारण सर्व मुली या माझ्या मुलींप्रमाणे आहेत. त्या "सुरक्षित" असाव्यात हा त्यामागील "हेतू" आहे . 

 चांगले "कर्म" हें नेहमीच बुमरँग प्रमाणे "परत" येत असते ,यावर माझी नितांत "श्रद्धा" आहे . पालकांनी मुलींवर अतिविश्वास न दाखवता आपल्या "लेकीवर" लक्ष ठेवावे ही विनंती !


 

       इकबाल बाबासाहेब मुल्ला

( पत्रकार) 

संपादक - सांगली वेध 

संपादक - वेध मीडिया न्यूज, सांगली. 

मोबाईल - 8983587160

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा