Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

*बारूळ ता. तुळजापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत "खरी कमाई *उपक्रमा अंतर्गत "आनंद मेळावा" संपन्न*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

                जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारूळ ता. तुळजापूर येथे" खरी कमाई" या उपक्रमांतर्गत" आनंद मेळावा "आयोजित करण्यात आला होता.  



           

          याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक .लोखंडे सर ,शाळा व्यवस्थापन . समितीचे अध्यक्ष मन्मथ ठोंबरे, उपाध्यक्ष सुधीर लांडगे, शिक्षण तज्ञ बाबुराव ठोंबरे, सरपंच शहाजी सुपनार, उपसरपंच राजकुमार वट्टे,तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष संजय ठोंबरे, ग्रा.पं.सदस्य सुभाष पाटील, सुधीर सूपनार, अनिल यावलकर, शिक्षक ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात सर्वांनी विविध वस्तू खरेदी केल्या , विविध स्टॉलला भेट देऊन खाण्याचे पदार्थ खाऊन आनंद घेतला, विद्यार्थ्यांनाही नफा तोटा या संकल्पना या आनंद मेळाव्यातून समजल्या. उसाचा रस झाडू विक्री, विविध पाण्याचे पदार्थ पाणीपुरी भाजीपाला, जनरल स्टोअर्समधील साहित्य, अक्षय कांदे याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. व्यवहार न्यान काय असतं या उपक्रमातील विद्यार्थ्याला समजले त्यामुळे विद्यार्थ्यात आनंदाचे वातावरण होते. शेवटी मैदानाची स्वच्छता करून कचरा व्यवस्थापन काय असते हे समजावून सांगितले. नंतर साफसफाई करून कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा