Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

*"निखिल वागळे "-यांना जर "फुले-शाहू -आंबेडकर" यांचा खरोखरच पुळका आहे तर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारावा*

 


*श्रीपूर---बी.टी.शिवशरण.

           महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ पत्रकार व सतत फुले शाहू आंबेडकरांच्या नावाने जप करणारे व निर्भीड सडेतोड व वैचारिक परिवर्तनवादी विचारांची बांधिलकी म्हणून पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार करावा त्यांच्या सडेतोड व वादळी व्यक्तिमत्त्वाचा ते सतत डंका वाजवत असतात ते जेव्हा जेव्हा अडचणीत येतात तेव्हा ते विश्व भूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रांतीज्योती महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने भावनिक आवाहन करतात ते जरी स्वतंत्र विचारांची बांधिलकी जपण्यासाठी आपल्या मुलभूत अधिकार वापरून इतरांवर ज्या भाषेत तोंडसुख घेतात त्यामुळे इतर धर्मियांना विरोधकांना अत्यंत खालच्या पातळीवर शब्दप्रयोग करुन त्यांच्या भावनांना पायदळी तुडवत असतात स्वतंत्र भारतात सर्वांना आपले विचार मत भुमिका लिखाण करण्याचे स्वातंत्र्य आहे त्यामुळे आपण जरी पत्रकार असला तरी न्याय नितीमत्ता कायदे सभ्यता व आदर ठेऊन सैद्धांतिक मांडणी विचारपूर्वक केली पाहिजे देशाचे सर्वोच्च स्थान असलेल्या पंतप्रधान माजी उपपंतप्रधान यांना जर ते एका चोराने दुसर्यां चोराला दिलेला भारतरत्न पुरस्कार आहे एवढ उपहासात्मक व बदनामीकारक भाषा वापरणे म्हणजे पुरोगामी सुसंस्कृत महाराष्ट्रात खळबळजनक ठरत नाही का पत्रकारांना सभ्यता संस्कृती वास्तवतेचे भान असले पाहिजे पत्रकारांनी सामाजिक राजकीय सांस्कृतिक वैचारिक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक एकसंधतेला प्राधान्य दिले पाहिजे पत्रकार आहे म्हणून काही ही लिहिले बोलता येते म्हणून सर्व पातळी सोडून निव्वळ गरळ ओकून कसे चालेल वागळे वादग्रस्त वक्तव्य लिखाण करण्यात माहीर आहेत ते जेव्हा इतर धर्मियांना दुखावण्याचा नेहमी प्रयत्न करतात असभ्य भाषेत तोंडसुख घेतात तेव्हा त्यांच्या बाबतीत अडथळे येणारच ते जेव्हा विरोधकांना आव्हान देतात तेव्हा दुसर्या राजकीय पक्षांचे उदोउदो करतं असतात त्यांना यातून वाचवण्यासाठी फुले शाहू आंबेडकर विचारांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना भावनिक आवाहन करतात त्यामुळे दोन गटात समाजात धर्मात तेढ वाढवण्याचे काम त्यांचे कडून होत असते पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या व फुले शाहू आंबेडकरांच्या नावांची ढाल वापरून ते स्वतःला संरक्षण घेतात आंबेडकरी अनुयायी यांचे त्यांना आवाहन आहे की निखिल वागळे यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार करावा व आपली संस्कृती परंपरा सभ्यता जपावी महाराष्ट्रात आरे ला कारे करण्याची धाडसी परंपरा आहे त्यामुळे त्यांनी आपण काय पेरत आहोत जे पेरणार तेच उगवणार यांचे भान ठेवण्याची तयारी ठेवावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा