*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व शिवसेना शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून तब्बल सात लाख रुपये खर्चून ओपन जिम कार्यरत करण्यात आली आहे यामुळे गावातील तरुणासह सर्वांची व्यायामाची सोय झाल्याने समाधान व्यक्त होत आहे काक्रंबा या दहा हजार लोकसंख्येच्या या गावात पोलीस भरती आर्मी भरती मध्ये दाखल होणाऱ्या तरुण तरुणांची संख्या जास्त प्रमाणात आहे भरतीची पूर्वतयारी करण्यासाठी गावातील तरुणांना व्यायाम करण्याची कोणतीही साधने नव्हती त्यामुळे हीच गोष्ट लक्षात घेऊन सर्वसामान्य कुटुंबातील तरुण पोलीस व आर्मी भरती होण्याची असूनही व्यायामाची साधन उपलब्ध होत नसल्याने त्यांना अडचण येत होती हीच गोष्ट लक्षात घेऊन शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर यांनी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या माध्यमातून जिल्हा कडा संकुल विभागाकडे ओपन जिमची मागणी करून त्याचा पाठपुरावा केला व गावात अखेर ओपन जीम मंजूर करून आणली याबद्दल गावातून समाधान व्यक्त होत आहे गावकऱ्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर व चेतन बंडगर यांचे आभार मानले आहेत..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा