*संपादक ----हुसेन मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिव चे लोकप्रिय आणि जनतेच्या गळ्यातील ताईत ओमराजे निंबाळकर यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवारी घोषित केल्यानंतर आपल्या मतदारांना केलेले आवाहन वाचा
प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो....
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
जय महाराष्ट्र, मी आपल्या मतदारसंघातील खासदार म्हणुन आपल्या समोर येत आहे. पाच वर्षापूर्वी ज्या अपेक्षेने तुम्ही मला एक नातु, मुलगा, भाऊ, मित्र म्हणुन मतदानारुपी आर्शिवाद दिले, याची जाणीव माझ्या मनात आजही तशीच आहे. मी खासदार म्हणून निवडुन आलो तेव्हापासुन तुमच्या घरातील एक सदस्य म्हणुनच आपल्या संपकति आहे. अशा काळात आपल्या भागातील अनेक महत्वाच्या प्रश्नावर मी संसदेत आवाज उठवत होतो. शिवाय पहिल्या दोन ते अडीच वषति राज्यात महा विकास आघाडी साकारली त्यामुळे या भागाचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे आपल्याला शक्य झाले. कोरोनासारख्या भयानक संकटात आपण
सगळ्यांनी मिळून त्यावर मात केली. आज देशाची लोकशाही धोक्यात आल्याची भावना सर्वसामान्य लोकांतुन व्यक्त होत आहे. तेव्हा सजग नागरीकांच्या अमुल्य मतांच्या जोरावरच देशात सुरु असलेली अघोषित आणीबाणी थांबवता येईल. ही निवडणुक तुम्ही मतदारांनीच हाती घेतल्याने तुमच्या माध्यमातुन मिळणारे आर्शिवाद, पाठबळ फक्त माझेच हात बळकट करणार नाही तरभारत देशाच्या या ऐतिहासिक लोकशाही वाचवण्याच्या लढ्यात आपल्या सर्वांचं हे अमुल्य योगदान असणार आहे.
आपला हक्काचा माणूस
ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर
'महाविकास आघाडी' चे अधिकृत उमेदवार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा