Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ७ मार्च, २०२४

*इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस (अजित पवार) उपाध्यक्षपदी --"नियाज खाजा शेख "यांची निवड.*

 


*इंदापूर तालुका --प्रतिनिधी*

*एस.बी.तांबोळी*

*टाइम्स 45 न्युज मराठी.

             

राष्ट्रवादी युवक काँग्रेस( अजित पवार )इंदापूर तालुका उपाध्यक्षपदी लुमेवाडी ता.इंदापूर जि. पुणे येथील *नियाज खाजा शेख" यांची निवड केल्याचे नियुक्ती पत्र सुनेञा( वहिनी) अजित पवार यांच्या हस्ते नुकतेच इंदापूर येथे देण्यात आले.



राष्ट्रवादी काँग्रेसपार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांचे सामाजिक समतेचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून करणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आमदार दत्तात्रय( मामा) भरणे, जिल्हाध्यक्ष- प्रदीप दादा गारटकर, इंदापूर तालुका अध्यक्ष -ॲड.शुभम निंबाळकर ,यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे संघटन मजबूत करण्यासाठी अनमोल योगदान देणार असल्याचे इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नुतन उपाध्यक्ष--" नियाज खाजा शेख" यांनी यावेळी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा