*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो. 9730 867 448
सायबर ठग प्रति दिवस लोकांना धोका देण्याची नवनवीन शक्कल वापरत आहेत कधी निवडणुकीच्या अनुषंगाने फ्री रिचार्ज ,तर कधी के.वाय.सी च्या नावाने जनतेला लुटण्याचा प्रयत्न केला जात आहे या आठवड्यात सायबर लुटारूनी "मुकेश अंबानी"च्या वाढदिवसानिमित्त सायबर लुटीचा प्रयत्न करत आहेत
अशा प्रकारे जनतेला ठगले जात आहे हे सायबर ठग जनतेच्या मोबाईल फोनवर मेसेज पाठवत आहेत की ज्यामध्ये लिहिलेले असते की "मुकेश अंबानी" यांच्या "जिओ "कंपनी सर्व भारतीय जिओ ग्राहकांना 84 दिवसांसाठी 555 रुपयाचा मोफत रिचार्ज देत आहे त्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंकला क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर टाकण्याचा पर्याय येतो मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओटीपी येतो तो एक्सपर्ट च्या मतानुसार ओ टी पी टाकताच बँक अकाउंट रिकामे होण्याचा धोका होऊ शकतो .याच सप्ताहात कित्येक मोबाईल ऑपरेटर्सनी टेरिफ हॅक केला होता ज्यामुळे रिचार्ज च्या किमतीत मोठी घट झाली होती "इन्स्टेट मेसेजिंग ॲप "व्हाट्सअप वर एका लिंक सह मेसेज व्हायरल होत आहे ज्यामध्ये दावा केला जात आहे की रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष-" मुकेश अंबानी" आपल्या वाढदिवसानिमित्त ग्राहकांना गिफ्ट कार्ड देत आहेत मात्र एका ग्राहकाने या मेसेज प्रमाणे माहिती दिली आणि ओ.टी.पी. दिला मात्र खरी पडताळणी केल्यानंतर लक्षात आले की हा मेसेज -फेक -आहे त्यामुळे सोशल मीडिया मार्फत हॅकर्स सर्वसामान्य मोबाईल वापर कर्त्यांना लुटण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच लिंक च्या माध्यमातून हॅकर्स तुमच्या खाजगी डाटापर्यंत पोहोचू शकतात असेही एक स्पष्ट चे म्हणणे आहे शिवाय लिंक ला ओपन केल्यामुळे तुमच्या बँक अकाउंट वरील रक्कम लुटण्याचा घात होऊ शकतो ? त्यामुळे अशा बनावट व फेक लिंक वर क्लिक न करता या धोक्यापासून आपला बचाव होऊ शकतो त्याकरिता जिओ ग्राहकानी सावधानता बाळगण्याची गरज आहे तरी अशा फेक लिंक द्वारे सर्वसामान्याला लुटणाऱ्या सायबर गुन्हेगारावर शासन आळा घालणार ? मोबाईल वापरकर्त्यांना लुटण्यापासून वाचवणार का? असे मोबाईल वापरकर्त्यांमधून मागणी होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा