*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून प्रवासांना नाहक ञास सोसावा लागत असून पुणे पंढरपूर मार्गावरील सासवड येथील एसटी स्टँडवर महिलांना आलेला अनुभव त्या महिलांकडून कडून वाचा
बारामती येथील सामाजिक कार्यकर्त्या कल्पना जाधव काटकर या काही कामानिमित्त पुणे येथे गेल्या होत्या पुणे येथील पुणे येथील काम आटोपून त्या परत बारामतीला येण्यासाठी स्वारगेटला स्वारगेट पंढरपूर बस मध्ये बसल्या ही बस सासवडला आल्यानंतर या बसचा काही तांत्रिक घोटाळा झाल्याने उशीर लागणार होता त्या महिला असल्याने रात्रीची वेळ होते त्यांना तातडीने बारामतीला पोहोचायचे होते म्हणून ते सासवड येथील एसटी स्टँडवर कंट्रोल केबिनला गेले असता तो कंट्रोलर कंट्रोल केबिन बंद करून गेलेला होता ती वेळ होती रात्री 8:8 मिनिटांची विशेषतः या मार्गावर पुणे पंढरपूर गाड्या ची येजा होत असते तसेच कंट्रोलर जर ड्युटी संपण्याच्या वेळेपूर्वीच बंद करून जात असेल तर रात्री अप रात्री महिला प्रवाशांनी कोणाकडे चौकशी करायची हा महत्त्वाचा मुद्दा आहे
23/03/2024 रोजी पुणे पंढरपूर हे लांब पल्ल्यासाठी जाणारी बस चेक न करता सोडला जातात या मार्गावर यांना जाणाऱ्या बसेस तपासून सोडल्या जात नाहीत वारंवार बसेस पंचर होणे लाईट बंद पडणे आणि इतर प्रॉब्लेम निर्माण होतात त्यामुळे एसटी महामंडळाच्या आगारातील कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने नाहक महिलांना त्रास सहन करावा लागत आहे दिनांक 23 मार्च 2024 रोजी पुण्याहून पंढरपूर कडे निघालेली बस क्र. 0010861,साधी बस M7533स्वारगेट पुणे ते पंढरपूर
या बसचा तिकीटावर सरळ लिहले आहे कि "महिला सन्मान" तर प्रवासात महिलांना ५०% टक्के सवलत देऊन सन्मान करत आहे माञ दुसरी कडे राञी अपराञी बसेस न सोडून महिला भगिणीची गैरसोय करत आहे ,हा महिलांचा सन्मान आहे कि आवमान आहे? याला जवाबदार कोण? मग आता पुढे वाचा महिलांचा सन्मान कसा केला गेला. बसच्या लाईटचा प्रॉब्लेम झाला म्हणून बसमधून प्रवासांना उतरवले गेले.आम्ही पाच महिला कंट्रोल केबिन ला जेजूरी बारामती बस विचारणास गेलो असता कंट्रोल मधे कोणीही नव्हते 8वाजून 8मिनटे झाली होती.बाहेर वर्दीवर दोघे एसटीचे कर्मचारी उभे होते ते म्हणाले की बारामतीसाठी आता गाडी नाही .दिसल त्या खाजगी वाहनाला हात करून जा त्यानंतर आम्ही दुसऱ्या वाहनाने जेजुरीला आलो तिथेही हेच ऐकायला मिळाले हे ऐकून संताप झाला,परंतु शांत बसणे वाचून पर्याय नव्हता म्हणून शांत बसलो आणि सासवड कंट्रोलचा नंबर मागणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या पुणे जिल्हा संघटिका ज्योतीताई गाडे नुकत्याच त्या इंदापूर येथील शेतकरी मेळावा हा कार्यक्रम आवरून घरी आल्या होत्या, तरीही त्यांनी क्षणाचा विलंब न कराता आपल्या पक्षातील एक महिला अपराञी बस स्टॅडवर आहे ,हे समजताच आपला पतीसह मुलाला घेऊन माझ्या मदतीला धावून आल्या नंतर मी .कल्पना जाधव [काटकर]
बारामती शहर पोलीस काॅन्सटेबल दशरथ इंगोले यांच्या मदतीने ,जेजूरी पोलीस नाईक शशिकांत लोंढे यांचा सहकार्याने ज्ञानेश्वर किसन हजारे यांची गाडी MH 12 VL4604या गाडीतून दिपाली पवार व त्यांचा बरोबर एक महिला व दोन मुलीना घेऊन बारामतीला राञी बाराचा सुमारास पोहोचलो
त्यामुळे मी कल्पना जाधव [काटकर] परिवहन मंत्री व
एसटी महामंडळास आवाहन करू इच्छीते की आपण महिलांचा सन्मान करावा आणि एकादी महिला अडचणीत असल्यास तीला सहकार्य करावे ,जेणे करून ती माता माऊली तिचा निवास्थानी सुखरूप पोहचेल शिवाय स्वारगेट येथून रात्री साडेनऊ वाजता जेजुरी बारामतीकरता बस सोडण्यात यावी जेणेकरून महिलांना अशा संकटांचा सामना करावा लागणार नाही
कल्पना जाधव (काटकर)
सामिजीक कार्यकतीॅ 7620765805
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा