Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २४ मार्च, २०२४

*"व्यसनाची होळी"हा महर्षी प्रशालेचा उपक्रम स्तुत्य ---विठ्ठल गायकवाड*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

                समाजात सध्या व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असून शरीराला त्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी पोहोचत आहे विद्यार्थ्यांनी शालेय जीवनाबरोबरच पुढील जीवनात कोणतेही व्यसन करू नये यासाठी प्रशालेच्या वतीने राबवण्यात आलेला व्यसनांची होळी हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे असे प्रतिपादन माळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड यांनी केले ते महर्षी प्रशाला यशवंत नगर येथील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम या विभागाकडे आयोजितचला व्यसनांची होळी करूया निरोगी जीवन जगूया या होळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते यावेळी कोळेगावचे मुकेश निंबाळकर सर, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्रमुख प्रा.विष्णू माने,प्रा. राजेंद्र कांबळे हे उपस्थित होते. 



   व्यसनमुक्तीची होळी करून सुदृढ व निरोगी आरोग्याचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला

यावेळी विद्यार्थ्यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत तंबाखू,सिगारेट,गुटखा यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांची होळी केली



यावेळी विद्यार्थ्यांनी आम्ही पुढील आयुष्यात कोणतेही व्यसनाच्या आहारी जाणार नाही आणि गावातील परिसरातील व्यक्तीला व्यसनाच्या आहारी जाऊ देणार नाही अशी व्यसनमुक्तीची शपथ घेतली कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रा. धनंजय देशमुख यांनी केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा