Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २९ मार्च, २०२४

*दिल्लीचे मुख्यमंत्री," अरविंद केजरीवाल" यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली-- केजरीवालांना मोठा दिलासा*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448


* नवी दिल्ली:-- दिल्‍ली मद्य धोरण संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्‍यात यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका दिल्‍ली उच्च न्यायालयात आज (दि.28 मार्च) फेटाळली.

अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्‍यात यावे की नाही, ही एक राजकीय बाब आहे. ती न्यायव्यवस्थेच्या कक्षेत येत नाही. त्यामुळे यात न्यायालयीन हस्तक्षेपाची गरज नाही, असे स्‍पष्‍ट करत दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती मनमोहन आणि न्यायमूर्ती मनमीत प्रीतम सिंग अरोरा यांनी याचिका फेटाळली.

अरविंद केजरीवाल यांच्‍यावर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप आहे. अशा व्‍यक्‍तीला मुख्‍यमंत्रीपदावर राहण्‍याचा अधिकार नाही. त्‍यांना पदावरुन हटविण्‍यात यावे, अशी मागणी करणारी याचिका दिल्लीतील सुरजित सिंग यांनी दाखल केली होती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा