Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २७ एप्रिल, २०२४

*धाराशिव लोकसभेचे उमेदवार -ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते आप्पासाहेब पाटील यांचा गाव भेट दौरे*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448


तुळजापूर तालुका हा काँग्रेस पक्षाचा गड आहे तो शाबीद ठेवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देणार - काँग्रेस नेते आप्पासाहेब पाटील यांनी एल्गार

केला आहे



तुळजापूर तालुक्याचे जेष्ठ नेते मा. जिल्हा अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस .आप्पासाहेब पाटील हे मागील आठवड्या पासून तुळजापूर तालुक्याचा दौरा करीत आहेत.आज किलज , सलगरा, वानेगाव,

होर्टी ,वानेवाडी ,खुंटेवाडी, काटी तांडा ,वडगांव काटी, येथे भेटी दिल्या.



धाराशिव जिल्ह्याचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार .ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारा करिता दररोज 8 ते 10 गावे फिरून गावा-गावात वाडी-वस्ती तांडा येथे जाऊन लोकांना ज्यास्तीत ज्यास्त संख्येने ओमराजे यांना मतदान करण्यासाठी आवाहन करीत आहेत.त्या बरोबर इंडिया आघाडी ही मजबूत असून तीच सत्तेत येणार असल्याचा विश्वास कार्यकात्यांना दिला. व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे भारतीय स्वतंत्र लढ्यातील योगदान सांगत मोदी सरकाचे शेतकरी धोरण कसे चुकीचे आहे हेच सांगितले.व तुळजापूर तालुक्यात व उस्मानाबाद जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी विद्यार्थी दशेतून अर्थात 1957 पासून कार्य करतो.तुळजापूर तालुका हा "शेकाप" पक्षाचं बालेकिल्हा असून अतिशय संघर्षातून काँग्रेस पक्षाचे "बिज" तालुक्यात पेरले. व जिल्ह्यातील तुळजाभवानी कारखाना /पंचायत समिती /जिल्हा परिषद/DCC बँक/सूतमील /विधानसभा ताब्यात घेताना 50 वर्ष अविरत संघर्ष केला. सद्यास्थितीला काँगेस पक्षामध्ये थोडी पडझड झाली असली तरी पक्षाला पुन्हा उभारी देणार व कार्यकरत्याला वाऱ्यावर सोडणार नाही असा विश्वात देत. कोणी कोठे गेले असले तरी पक्ष जोमाने वाढवीन्यसाठी प्रयत्न करणार .तसेच कोणाची काही अडचण असेल तर तुळजापूरातील माझ्या कार्यालयाशी संपर्क करावा मी तुमच्यासोबत आहे असा विश्वास दिला. तसेच 2019 ला जेष्ठ नेते माजी मंत्री मधुकराव चव्हाण यांच्या पराभवाच वचपा काढण्यासाठी जीवाचं रान करेन* त्यासाठी तुम्ही माझ्या पाठीशी खंबीर पणे उभे रहावे आशी विनंती करतो.त्या वेळी किलज ,सलगरा,वानेगाव

,होर्टी ,वानेवाडी ,खुंटेवाडी काटी तांडा ,वडगांव काटी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा