*विशेष ----प्रतिनिधी*
*एहसान ---मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9096 837 451
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मुख्याधिकारी अकलूज तथा नोडल अधिकारी स्वीप, माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 25/4/2024 रोजी अकलूज नगर परिषद कार्यालय येथे बचत गट महिलांच्या रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत जवळपास 50 महिलांनी सहभाग नोंदविला रांगोळीच्या माध्यमातून मतदान वाढविण्यासाठी विविध संदेश देण्यात येऊन जनजागृती करण्यात आली.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती विजया पांगारकर , तहसीलदार सुरेश शेजुळ, गट विकास अधिकारी विनायक गुळवे,मुख्याधिकारी अकलूज तथा स्वीप नोडल अधिकारी माळशिरस दयानंद गोरे यांच्या संकल्पनेतून गावोगावी विविध मतदान जनजागृतीसाठी सूचना देण्यात आल्या. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत जळबावी येथे घंटागाडीवर मतदान जनजागृतीची ऑडिओ क्लिप लावून संपूर्ण गावभर फेरी काढण्यात आली. तसेच ग्रामपंचायत पिलीव येथे शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ यांच्या सहभागातून प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांमार्फत जनजागृतीपर विविध घोषणा देण्यात आल्या. या प्रभात फेरीत जवळपास १५० शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ सहभागी झाले होते .
सुळेवाडी ग्रामपंचायतीने
दि. 26/04/2024 रोजी लोकसहभागातून संपूर्ण सुळेवाडी गावात प्रभात फेरी काढण्यात आली. ग्रामपंचायत बोरगाव येथे जि. प. प्रा.केंद्र बोरगाव शाळा येथे विद्यार्थ्यांची रॅली घेण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना निवडणूक बाबतची मतदान शपथ देण्यात आली. 43- माढा लोकसभा मतदासंघातील नागरीकांना 100% मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा