*सांगली --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्युज मराठी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माफक फी मध्ये दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शिवगंगा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित विश्वेश्वरय्या टेक्निकल कॅम्पस पाटगाव- मिरज,सांगली हा नेहमी कार्यरत असतो.याचबरोबर महाविद्यालयाचे संचालक डॉ. इंद्रजीत यादव यांचे प्रयत्नातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हे शिक्षण चांगल्या पद्धतीने मिळावे यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात.याचाच एक भाग म्हणून विद्यापीठ अनुदान आयोग आणि नेक ए प्लस मान्यता प्राप्त मंगलायातन विद्यापीठ,एनसीआर बेसवान,उत्तर प्रदेश बरोबर सामंजस करार झालेला आहे.
या कराराच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बीए,बीकॉम, बीएससी,एम.ए,एम.कॉम,
एमएससी,बीसीए,एमसीए,बी.लीब,एम.लिब,बीबीए,एमबीए यासारखे दर्जेदार ऑनलाइन व बहिस्थ शिक्षण अभ्यासक्रम विश्वेश्वरय्या टेक्निकल कॅम्पस मधून येणाऱ्या काळामध्ये सुरू करण्यात येणार आहेत.त्याच बरोबर महाविद्यालय व विद्यापीठातील शिक्षकांची देवाण घेवाण,सेमिनार,वेबिनार,कॉन्फरन्सेस यासारख्या विविध कार्यक्रम सुद्धा राबविण्यात येणार आहेत. तसेच ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून मोफत वस्तीगृहाची सुद्धा सुविधा देण्याचा मानस यावेळी डॉ. इंद्रजीत यादव यांनी सांगितले.
यासंदर्भात विद्यार्थी व पालकांनी प्रत्यक्ष महाविद्यालयास भेट देऊन याची अधिक माहिती घ्यावी अशी भावना त्यांनी व्यक्त केली.या करारा संबंधी महाविद्यालयाचे अध्यक्ष शिवाजीराव इंगवले,सचिव सतीश इंगवले व कार्यकारी संचालक बाळासाहेब इंगवले यांनी मार्गदर्शन केले व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा अशी आपेक्षा व्यक्त केली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा