Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २४ एप्रिल, २०२४

ए टी एस प्रज्ञाशोध परीक्षेत "शौर्य पाटील "राज्यात सहावा

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448


जि.प.प्राथमिक शाळा,रूई, ता.बार्शी,जि.साेलापूर येथील इयत्ता तिसरीत असणारा विद्यार्थी शाैर्य इंद्रजीत पाटील हा ए. टी.एस राज्यस्तरीय प्रज्ञाशाेध परीक्षेमध्ये राज्यात ' सहाव्या क्रमांकाने ' उत्तीर्ण झाला आहे.या परीक्षेसाठी त्याला साै.सुवर्णा डुरे मॅडम,श्री.शस्त्रघ्नु घाेडके सर,साै.वंदना सुरवसे मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.ग्रामीण भागातून आपल्या प्रतिभाशक्तीची अर्थातच अचाट बुध्दीमत्तेची चुणूक दाखविणाऱ्या या विद्यार्थ्याचे आजाेबा कल्याण जनार्दन पाटील,आजी विमल कल्याण पाटील,आई साै.शुभांगी इंद्रजीत पाटील, श्री.माधवराव कुतवळ,जनसेवक अमाेल(भैया)कुतवळ,तुळजापूर,श्री.पंडितराव लाेहाेकरे,श्री.चंद्रकांत पाटील,भागवत उकिरंडे,रावसाहेब पाटील,संजय भड,अमाेल देशमुख यांनी त्याला अनेक आशीर्वाद देऊन अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. 

     सुप्रसिद्ध साहित्यिक इंद्रजीत पाटील यांच्या या चिरंजीवाचे रूई पंचक्रोशीत तसेच वैराग - गाैडगाव भागात विशेष काैतुक व अभिनंदनाचा वर्षाव हाेत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा