*धाराशिव जिल्हा-- प्रतिनिधी*
*अमोल---गायकवाड*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो--8308 971 294
धाराशिव तालुक्यातील कनगरा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील शौर्य शरद झोरे या पहिली इयत्तेत शिकणाऱ्या चिमुकल्याने मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेत बाजी मारत राज्यस्तरीय बक्षिसास गवसणी घातली आहे.
मंथन वेलफेयर फाउंडेशन अहमदनगरच्या वतीने ४ फेब्रुवारी २०२४ रोजी एम.जी.के.ई.परीक्षा घेण्यात आली होती.ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानास वाव मिळावा हा या परीक्षेचा मुख्य हेतू असून या परीक्षेची गुणवत्ता यादी ८ एप्रिल रोजी नुकतीच जाहीर करण्यात आली.या परीक्षेत शौर्य शरद झोरे या चिमुकल्याने बाजी मारत राज्यस्तरीय बक्षीस मिळवल्याने जि.प.केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक लोहार व्ही.के,वर्गशिक्षिका श्रीम.साबळे यु.ए,तिघाडे व्ही.एस,जगताप एल.एन,बिक्कड आर.ए. श्रीम.पांचाळ आर.जी,कदम आर.सी, लोहार आर.व्ही आदि शिक्षक व पालक शरद झोरे, सोनाली झोरे,आदिसह कनगरा गावातील नागरिकांनी शौर्यचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा