महाराष्ट्रात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवीन मराठी वर्षाची सुरुवात करण्याची परंपरा आहे.गुढीपाडवा प्रामुख्याने महाराष्ट्रात हिंदू नववर्षाची सुरूवात म्हणून साजरा केला जातो.माळीनगर (ता. माळशिरस) परिसरात मोठ्या उत्साहाने गुढीपाडवा हा सण साजरा करण्यात आला.
या दिवशी गुढी ही उंच बांबूच्या एका टोकाला नवीन साडी,कडुलिंब,फुलांचा हार आणि साखर गाठीचा हार बांधून त्यावर तांब्या किंवा चांदीचं भांडं बसविले जाते.नंतर पाटावर तांदूळ ठेवून गुढी उभी केली. पाटाभोवती रांगोळी काढून त्याला पुरणपोळीचा प्रसाद दाखवण्यात आला.यामध्ये लहान मुलांचाही उत्साह दिसून आला.
आपल्या देशात वर्षभरात अनेक सण साजरे केले जातात. त्यापैकी गुढीपाडवा हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात सुंदर आणि आनंदाने साजरा केला जाणारा सण आहे.मराठी नववर्षाची सुरुवात म्हणून ग्रामीण भागात अत्यंत आनंदाने हा सण साजरा केला जातो.हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो.हे साडेतीन मुहूर्त म्हणजे गुढी पाडवा,अक्षय्य तृतीया आणि दिवाळी पाडवा आणि दसरा हा अर्धा मुहूर्त मानला जातो.त्यामुळे गुढीपाडव्याला आपल्याकडे विशेष स्थान आहे.
महाराष्ट्रात गुढीपाडवा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.या दिवशीचे आरोग्यासाठी ही फायदेशीर असे पदार्थ नैवेद्य म्हणून तयार करण्यात आले होते.पुरणपोळी,श्रीखंड,पुरी तसेच इतर पदार्थांचा बेत करण्यात महिलावर्ग दंग असतात.
*चौकट*
*कडुलिंबाचे महत्त्व-*
*या दिवशी कडुलिंबाचे खास महत्त्व असल्याचे सांगितलं जाते.या दिवशी गुढीला कडुनिंबांच्या कोवळ्या पानांची डहाळी बांधली होती.या दिवशी गोड पक्वान्नांसोबत कडुलिंबाची पानेदेखील खाण्यासाठी देण्यात येते.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा