*संपादक -----हुसेन मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.-- 9730 867 448
उस्मानाबाद धाराशिव चे माझे खासदार प्राध्यापक विश्वनाथ उर्फ रवी गायकवाड यांनी मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द काढून त्यांच्या भावना दुखावलेल्या निषेधार्थ त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून एडवोकेट अजय दिलावर खान यांनी जुन्नर पोलीस स्टेशन जुन्नर जिल्हा पुणे येथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होण्यासाठी
- इसम नामे रवींद्र विश्वनाथ गायकवाड उर्फ रवी गायकवाड माजी खासदार, धाराशिव याने वाशीम (महाराष्ट्र) येथे एका प्रचार सभेत मुस्लीम धर्मा बाबत अक्षेपार्य वक्तव्य केले म्हणून त्याचे विरुद्ध भा.द.वि.क. 153A, 295, 295A. 504, 505(2) प्रमाणे गुन्हा दाखल होणे बाबत मागणी केली आहे मी अजित दिलावर खान वरील ठिकाणी कायमस्वरूपी राहावयास असून वकिली व्यवसाय करून स्वताची व कुटुंबियांची उपजीविका करत आहे. दिनांक ६/५/२०२४ रोजी दुपारी २ वाजताचे सुमारास मी जुन्नर येथील माझे कार्यालयात असताना माझे मोबाईल मधील यु ट्यूब वर वाशीम येथील एक प्रचार सभे चा व्हिडीओ पाहत असताना मी पाहिले आणि ऐकले कि, त्या सभेत एक रवी गायकवाड नावाचा इसम माईक वर भाषण करत असताना जाहीर रित्या मुस्लीम धर्म आणि त्यांचे मौलाना तसेच त्यांची दाढी बाबत अक्षेपार्य वक्तव्य केले ते असे कि, या शहरामध्ये "फतवा जर कोण काढू शकत असेल तर फक्त रवी गायकवाड काढू शकतो, कुठलाही मौलाना फतवा काढू शकत नाही, दाढी बढ़ाया तो हमारे वासते बढ़ाया तू, नई तो नई बढ़ा सकता हम ठैराये तो, नई तो ऐरो गैरो खैरो कहासे तो एखादे मस्जिद में आया होगा उसकू संभाल के बोलने का ऐसा नही चलेगा, दाड्या जाळायलाच येणार आहेत.... असे जाहीर रीत्या बोलल्याने मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून सदर वक्तव्य हे समजा समाजात तेढ निर्माण होऊन, वाद होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा या उद्देशाने केलेले आहे. सदर इसमा विरुद्ध माझी कायदेशीर फिर्याद असून त्या इसमा विरुद्ध भा.द.वि.क. 153A, 295, 295A, 504, 505(2) प्रमाणे गुन्हा दाखल करून मुस्लीम समाजाला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा