*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
नवी दिल्ली - 09 मे :--
देशभर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची आज (गुरूवारी) भेट घेणार आहेत. इंडिया आघाडीला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कामकाजांवर त्यांचा संशय आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ आता थेट राष्ट्रपतींशी चर्चा करणार आहे.
मतदानाच्या वाढत्या टक्केवारीच्या आरोपांवरुन शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली. देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. त्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढल्याचा आरोप विरोधकांनी केला.
दोन्ही टप्पे मिळून ६० टक्के सरासरी मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने कळवले. मात्र ११ दिवसांनी म्हणजेच ३० एप्रिलला ६६ टक्के मतदान झाल्याची सुधारित आकडेवारी निवडणूक आयोगाने दिली. याचाच अर्थ आधी आणि नंतर दिलेल्या आकडेवारीत ६ टक्क्यांचा फरक आहे. याआधीपर्यंत मतदानाच्या दुस-या दिवशी जी आकडेवारी मिळायची तीच अंतिम मानली जायची. पण यंदा ११ दिवसांनी सुधारित आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे हा विलंब का लागला? याचे उत्तर विरोधक निवडणूक आयोगाकडे मागत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा