Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ८ मे, २०२४

ऐन उन्हाळ्यात निरे पाठोपाठ भिमा नदीवरील बंधारे कोरडे पडल्याने शेतीच्या व पिण्याचे पाण्याचे अभुतपुर्व संकट

 


इंदापूर तालुका प्रतिनिधी एस.बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

- ऐन उन्हाळ्यात निरे पाठोपाठ भिमा नदीवरील बंधारे कोरडे पडल्याने शेतीच्या व पिण्याचे पाण्याचे अभुतपुर्व संकट निर्माण झाले आहे. भिमा नदी नुकतीच कोरडी पडली आहे तर नीरा नदी मागील आठ महिने पासून कोरडी पडल्याने इंदापूर व माळशिरस तालुक्यातील हजारो एकरावरील पिकांचे वाळवंट झाले आहे. तर पिण्याच्या पाणी योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे वीर धरणातून नीरा नदीत तर उजनी धरणातून भिमा नदीत पाणी सोडून बंधारे भरुन जनावरांच्या चारा व पाण्याची सोय करण्याची मागणी शेतकरी, नागरीक व महिलांनी केली आहे.  



      नीरा नदीतील पाणी मागील आठ महिन्यापासून आटल्याने गिरवी, ओझरे, लुमेवाडी, सराटी आदी बंधारे रिकामे पडले आहेत. तसेच नीरा नदीकाठावरील इंदापूर तालुक्यातील सराटी, लुमेवाडी, गोंदी, गिरवी, नरसिंहपूर, निरनिमगाव, चाकाटी तसेच माळशिरस तालुक्यातील संगम, गणेशगाव, बिजवडी, सवतगाव, तांबवे, माळीनगर, अकलूज आदि गावातील हजारो एकरावरील उभी असणारी पिकांचे पाण्याअभावी वाळवंटात रूपांतर झाले आहे. तसेच नदी आटल्याने पर्कुलेशनअभावी गावांतील विहीरी, बोअर, तलाव कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्यासाठी महिला व नागरीकांवर भटकंतीची वेळ आली आहे. अभुतपुर्व असे जलसंकट निर्माण झाले आहे.     

    तसेच भिमा नदीवरील नरसिंहपूर, भाटनिमगाव व टणू बंधारेा उन्हाळ्यात कोरडे पडू लागले आहेत . त्यामुळे नदीवरील इंदापूर तालुक्यातील नरसिंहपूर, टणू, पिंपरी बुद्रूक, गणेशवाडी, बावडा, भांडगाव, भाटनिमगाव, बाभुळगाव तर माढा तालुक्यातील शेवरे, चांदज, टाकळी, गारअकोले, रुई, आलेगाव व रांजणी गावातील शेकडो एकर शेतातील पिकांची होरपळ होणार असून पिण्याच्या पाणी योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.



      इंदापूर तालुक्यातील नीरा व भिमा नद्यांच्या परिसराला पाण्यामुळे बागायती पट्ट्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. परंतू नीरा नदीवरील पाच बंधारे मागील आठ महिन्यापासून तर भिमा नदीवरील बंधारे कोरडे पडल्याने नदी काठावरील शेतीला मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचे शेतातील विहिरी व बोअरमधिल पाणी आटल्याने बंद आहेत. त्यामुळे शेतातील उभी असणारी पिके वाचवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यासमोर पडला आहे. बागायती पट्ट्याचे स्वरुप आता कोरडवाहूत रूपांतरित होते की काय अशी भिती व्यक्त केली जात आहे.

चौकट - सध्याला लोकसभा निवडणुकीत नेते दंग आहेत. मात्र निरा नदीच्या पाणी प्रश्न निकाली काढण्याचा जो ठोस आश्वासन देईल त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा मानस शेतकरी राजाने व्यक्त केला आहे. परंतू प्रशासन दिलेला शब्द पाळत नसल्याने शेतकऱ्यांच्या जिवन मरणाचा प्रश्नासाठी ऐनवेळी कठीण निर्णय घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांच्या पाण्याबाबत एकत्र घेतलेल्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यास उपमुख्यमंत्री अजित पवार साथ देणार का? अशीही चर्चा सर्वत्र चालू आहे.

फोटो - सराटी ( ता. इंदापूर ) नीरा नदीतील पाणी आटल्याने बंधारा व कोरडे पडलेले पात्र दिसत आहे.

 - पिंपरी बुद्रुक ( ता. इंदापूर ) भिमा नदी पाण्याअभावी कोरडी पडल्याने चिमणीलाही प्यायला पाणी नाही.

....................................................................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा