*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी**
*मो:-- 9730 867 448*
अकलूज पोलीस स्टेशन हद्दीतील बेवारस इसमा च्या वारसाचा तपास होणे बाबत जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे यांना अकलूज पोलीस ठाणे पोलीस हेडकॉन्स्टेबल/५३१ डी.के जाधव कडून आवाहन करण्यात येते की
अकलुज पोलीस ठाणे अ.म.नं. ९९/२०२५ बी एन एस एस १९४ या मयत प्रकरणातील मयत नामे एक अनोळखी बेवारस पुरुष वय अंदाजे ६० वर्षे यास दिनांक ०४/१२/२०२५ रोजी २१.३० वा चे पुर्वी महाळुंग येथील नगरपंचायत कार्यालयासमोर आजारी बेशुध्द स्थितीत असल्याने सरकारी अॅम्ब्ल्युन्स १०८ ने सदर बेवारस इसमास अॅम्ब्ल्युन्समधून उपजिल्हा रुग्णालय अकलुज येथे उपचारासाठी दाखल केले असता तो उपचारास दाखल करण्यापुर्वीच मयत झाला आहे. सदरचे मृत अनोळखी बेवारस पुरुष असून त्याचे वर्णन खालील प्रमाणे आहे.
अंदाजे वय ६० वर्षे, अंगात पिवळे रंगाचे जरकीन, पांढरे रंगाचा बनीयन, निळ्या रंगाची लुंगी, बांधा सडपातळ, उंची १६९ से.मी. रंग गोरा इत्यादी. सदर मृताच्या वारसाचा आपआपले हद्दीत ताबे पोलीसामार्फत तपास होवून माहिती मिळून आल्यास त्वरीत इकडील पोलीस स्टेशनला कळविण्यास विनंती आहे. मो. नं. 7038806204





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा