Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ६ मे, २०२४

*महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एकमेव कार्यतत्परआणि जनतेच्या गळ्यातील ताईत--- धाराशिव चे "खासदार --ओमराजे निंबाळकर"*

 


*संपादक ---हुसेन मुलाणी*

*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

आज दिनांक 5 मे 2024 रोजी लोकसभा निवडणूक 2024 च्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचाराची सांगता झाली असून काही राजकीय पक्ष ज्यांना आपण निवडून येऊ की नाही याचा आत्मविश्वास नसल्याने जाहीर सभा ,रॅली व इतर कार्यक्रमाला भोळ्या भावड्या जनतेला आमिष दाखवून 300ते 500 रुपये देऊन एखाद्या रोजंदारीचा पगार दिल्याप्रमाणे सभेसाठी लोकांना वाहनांनी आणून जाहीर सभेत गर्दी दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे शिवाय मतदानासाठी ही प्रत्येक मतदाराला 1000 ते 2000 रुपये देऊन पवित्र मतदानाचा आवमान करत आहेत हे लोकशाहीला घातक आणि मारक आहे      



   महाराष्ट्रातच नव्हे तर देशात एक असे उदाहरण आहे की मतदार खासदाराच्या प्रेमापोटी आणि सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या व आपल्या मतदारसंघात शंभर टक्के निधी खर्च करुन विकास कामाला प्राधान्य देणारा आणि पक्ष व पक्ष प्रमुखाप्रती प्रामाणिक असणारा देशातील एकमेव खासदार म्हणजे उस्मानाबाद धाराशिव चे खासदार ओमराजे पवनराजे निंबाळकर होय , आणि असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही 

   विशेषतः हे खासदार लोकसभा निवडणूक 2024 लढवत असून मतदारांनी "ओमराजे निंबाळकर" यांना मतदान करावे म्हणून मतदारांनी त्यांना मदत केल्याचे अनेक उदाहरणे आहेत प्रचाराच्या सुरुवातीलाच भूम परंडा भागातील एका शेतकऱ्याने त्यांना धनादेश दिला ,आणि मंगरूळ ता.तुळजापूर येथील एका चिमुकलीने चिंच फोडून मजुरी करून 1600 रुपयाची मदत केली तर कुंभारी ता. तुळजापूर येथील नाभिक समाजाच्या युवकांनी असा संकल्प केला की ओमराजे निंबाळकर यांना प्रत्येकानी मतदान करावे म्हणून त्यांनी अनेकांची मोफत दाढी करण्याचा संकल्प केला तर आपसिंगा ता. तुळजापूर येथील एका शेतकऱ्याने मतदारांनी "ओमराजे "यांना मतदान करावे म्हणून आपल्या शेतातील मेथीची भाजी मोफत वाटप केली असे अनेक प्रकारे त्यांना मतदान करावे म्हणून नागरिक उत्साहाने अनेक युक्त्या करत आहेत



       त्याच प्रमाणे तुळजापूर येथील कलर काम करणाऱ्या 10 मजुरांनी प्रत्येकाने आपली एका दिवसाची पगार प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे 5000 रुपयांचा मदतीचा धनादेश खासदार यांना प्रदान केला तर सिंदफळ येथील मतदारांनी प्रत्येकाने कोणी 1000रु.कोणी 500 रु अशा प्रकारे मदत केली काटगाव ता.तुळजापूर येथील शेतकरी किसन माहाजन यांनी 11000 रु मदत दिली आसुन खरोखरच खासदार ओमराजे यांचे जनते प्रति असलेले सेवेची तत्परता ही वाखणण्या जोगी आहे जे कलर काम करणारे दहा मजूर आहेत ते पुढील प्रमाणे 1)

अरुण वाघमोडे 2) दिनेश लवटे 3) शिवाजी खोत 4) आकाश थोडसरे 5) समाधान थोडसरे 6) सुरज वाघमोडे 7 )करण शिंदे 8) रवींद्र टेकाळे 9) सौरभ वाघमोडे 10) ऋतुराज वाघमोडे इत्यादी मजुरांची नावे असून खासदार ओमराजे यांनी 5000 रुपयाचा धनादेश स्वीकारावा अशी ही त्यांनी विनंती केली आहे..

आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांना मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून "विजय आपलाच"हे म्हणणे वावगे ठरणार नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा