*विशेष ----प्रतिनिधी*
*एहसान ---मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9096 837 451
लोकसभेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदानाची टक्केवारी कमी झाली तिसऱ्या टप्प्यात मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे यासाठी म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या योग साधकांनी मतदान जनजागृती शपथ घेतली.
सदगुरू श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली दर रविवारी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या या
साधकांची योग,प्राणायाम आणि सुदर्शन क्रिया घेतली जाते यावेळी सर्व उपस्थित साधकांना योग शिक्षक प्रा. धनंजय देशमुख यांनी 'आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून धर्म,जात यांच्या प्रभावाखाली न येता कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करणार' अशी शपथ दिली यावेळी उपस्थित योग साधकांनी मी मतदान करणार-तुम्हीही करा,वृद्ध असो जवान- आवश्यक करा मतदान अशा घोषणाही दिल्या यावेळी नवीन प्रविण खराडे, डॉ अभिमन्यू चव्हाण,उदय साळुंखे,नागेश कोरे,माळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड,संतोष इंगळे, प्रकाश जगताप,संजय देशमुख आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा